Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

भारतात ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस, बदलत्या हवामानात एक नवीन सामान्य परिस्थिती

भारतातील अनेक राज्यांमध्ये या वर्षीचा ‘ऑक्टोबर’ हा भारतीय पावसाळ्याच्या ऋतूतील ऐन मध्यातील महिना असल्यासारखे वाटते. तो अगदी सहजपणे ‘जून’ किंवा ‘जुलै’ म्हणूनही गणला जाऊ शकतो. भारतात अधिकृतपणे पावसाळा ऋतू हा 30 सप्टेंबर रोजी संपला आहे आणि पावसाची माघार देखील सुरू झाली आहे. ही माघार देखील अधिकृतरीत्या कमी जास्त करून अगदी 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण व्हायला हवी होती. परतीचा पाऊस म्हणून काही प्रमाणात पाऊस पडणे हे असामान्य नसले तरी, आकडेवारीवरून असे दिसून येते की असे झालेले नाही आणि यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये अभूतपूर्व प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कल वाढतो आहे.   

लांबलेला मान्सून

गेल्या तीन-चार वर्षात दिसून आलेला हा कल सुरूच असून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या माघारीस  या वर्षी देखील लक्षणीय विलंब झाला आहे. 2020 मध्ये, 28 ऑक्टोबर रोजी मान्सून पूर्णपणे माघारी गेल्याचे जाहीर करण्यात आले होते, ज्यामुळे 1975 पासून नंतर मान्सून भारतातून सर्वाधिक विलंबाने बाहेर पडण्याचा हा दुसरा प्रसंग ठरला. 2021 मध्ये, संपूर्ण देशातून मान्सून माघारी गेल्याचे 25 ऑक्‍टोबर रोजी जाहीर करण्यात आले ज्यामुळे तो प्रसंग 1975-2021 या कालावधीत मानून सर्वाधिक विलंबाने बाहेर पडण्याचा सातवा प्रसंग ठरला.

भारतातील अनेक राज्यांमध्ये या वर्षीचा ‘ऑक्टोबर’ हा भारतीय पावसाळ्याच्या ऋतूतील ऐन मध्यातील महिना असल्यासारखे वाटते. तो अगदी सहजपणे ‘जून’ किंवा ‘जुलै’ म्हणूनही गणला जाऊ शकतो. भारतात अधिकृतपणे पावसाळा ऋतू हा 30 सप्टेंबर रोजी संपला आहे आणि पावसाची माघार देखील सुरू झाली आहे. ही माघार देखील अधिकृतरीत्या कमी जास्त करून अगदी 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण व्हायला हवी होती. परतीचा पाऊस म्हणून काही प्रमाणात पाऊस पडणे हे असामान्य नसले तरी, आकडेवारीवरून असे दिसून येते की असे झालेले नाही आणि यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये अभूतपूर्व प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कल वाढतो आहे.   

 आता गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्टोबर मध्ये येणारा पाऊस वाढताना दिसत आहे. आसाम आणि ईशान्य भारताच्या इतर भागांमध्ये (NEI) सप्टेंबरच्या अखेरीस आणि नवीन सहस्राब्दीच्या सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्हाला याविषयी इंस्ट्रूमेंटल रेकॉर्ड्स वरून तसेच आमच्या ईशान्य प्रदेशातील (NER) क्षेत्र संशोधनादरम्यान, जिथे पावसाचे रेकॉर्डिंग आणि निरीक्षण करण्यासाठी पर्जन्यमापक नाही, ते स्थानिक लोकांकडून तेथील घटनां विषयी मिळालेल्या माहितीनुसार कळले” असे डॉ पार्थ ज्योती दास, ज्येष्ठ हवामान-पर्यावरण शास्त्रज्ञ आणि आरण्यकच्या जल, हवामान आणि धोका या विभागाचे प्रमुख म्हणाले.

 “ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याच्या घटनांचा परिणाम 2004 साली ठळकपणे दिसून आला होता जेव्हा आपण दक्षिण, मध्य आणि पश्चिम आसाममध्ये विनाशकारी पुराच्या अनेक घटना अनुभवल्या. वर्ष 2008 मध्ये आपण अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अचानक पूर आलेला पाहिला. वर्ष 2012 मध्ये या घटनेची पुनरावृत्ती झालेली आपण पहिली ज्यावेळी पश्चिम आसामच्या मोठ्या भागात लक्षणीय पाऊस झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पूर आला. 2020 मध्येही हाच अनुभव होता आणि आता 2022 मध्येही तोच अनुभव येत आहे. NER मधील अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात सामान्य पावसापेक्षा जास्त पाऊस पडत असल्याचा अहवाल आहे,” डॉ दास पुढे म्हणाले.

IMD नुसार, देशात ‘मान्सूनोत्तर’ दिवसांमध्ये पहिल्या दहा दिवसांत (1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर) 80% अतिरिक्त पाऊस पडला आणि वायव्य भारतात या कालावधीत 405% अतिरिक्त पाऊस पडला. अहवालानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसांत दिल्लीमध्ये 625% (सामान्य 8.8 मिमीच्या तुलनेत 63.8 मिमी), हरियाणामध्ये 577%, उत्तराखंडमध्ये 538% आणि उत्तर प्रदेशमध्ये 698% अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.

हे अशा वेळी घडत आहे जेव्हा IMD ने अधिकृतपणे 30 सप्टेंबर रोजी मान्सून हंगाम संपल्याचे आणि पंजाब, चंदीगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीरचे काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधून मान्सून माघारी गेल्याचे जाहीर केले होते.

मान्सूनच्या सतत विलंबाने होत असलेल्या माघारीमुळे अगदी माघारीच्या नवीन तारखा देखील ओलांडल्या गेल्याचे दिसते.

इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या प्रदेशातील बदलते हवामान, ज्याचा नैऋत्य मान्सूनवर निश्चितपणे परिणाम झाला आहे, लक्षात घेऊन IMD ने 2020 मध्ये मान्सून सुरू होण्याच्या आणि माघारीच्या तारखांमध्ये आधीच सुधारणा केल्या आहेत. या तारखांना मध्य, पश्चिम, पूर्व भारतातील काही भागांमध्ये तीन ते सात दिवस आणि वायव्य भारतात एक आठवडा ते दोन आठवडे उशीर झाला. मान्सूनच्या सलगच्या उशिरा माघारीमुळे माघारीच्या नवीन तारखाही ओलांडल्या गेल्याचे दिसते.

स्कायमेट वेदर सर्व्हिसेसच्या मते, या वर्षी मान्सूनची माघार ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबली  जाण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटले आहे की मान्सूननंतरही पाऊस सुरूच राहील आणि भारतात ऑक्टोबरमध्ये सरासरी पाऊस हा सामान्यपेक्षा 115% अधिक पडण्याची शक्यता आहे. या घटना भारतीय उपखंडातील मान्सूनचा कल बदलत असल्याचा पुरावा आहेत.

डाउन टू अर्थ यांनी मेरीलँड विद्यापीठ आणि आयआयटी-बॉम्बे येथील हवामान शास्त्रज्ञ रघु मुर्तुगुड्डे यांचे म्हणणे उद्धृत केले की, “मान्सूनचा कल असाच चालू राहिल्यास मान्सूनची व्याख्या बदलावी लागेल. तसेही आता केवळ दिनदर्शिकेचा तारखेनुसार जाणे ही योग्य कल्पना नाही, ते ऐतिहासिक सामान झाले आहे जे आता टाकून दिले पाहिजे.”

बदलते हवामान 

आत्तापर्यंत हे स्पष्ट झाले आहे की जागतिक हवामानाच्या आकृतिबंधामधील इतर अनेक महत्त्वपूर्ण बदलांप्रमाणेच, हवामान बदलामुळे प्रेरित घटकांद्वारे भारतीय मान्सून हंगाम देखील प्रभावित होत आहे. वाढत्या उष्ण जगाचे परिणाम अनेक स्वरूपात आणि मार्गांनी दिसून आले आहेत, जसे की, जगातील अनेक भागांप्रमाणेच भारतातही पावसाचे कमी परंतु तीव्र बरसणे आणि त्यानंतर दीर्घकाळ कोरडा जाणे.

आम्ही भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओएरॉलॉजी)  हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्याशी संपर्क साधला. कोल हे वातावरण बदलाचा अहवाल तयार करणाऱ्या अंतरशासकीय पॅनेलचे (IPCC) प्रमुख लेखक देखील आहेत. ते म्हणाले की 2000 च्या दशकापासून जागतिक हवामानावर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम  वेगाने होत आहे. 

“गेल्या काही दशकांपासून, जागतिक तापमानवाढ वेगाने होत आहे आणि त्याची चिन्हे 2000 च्या दशकापासून जागतिक हवामानाच्या कोणत्याही एका दिवसात दिसू शकतात. झेड पिढी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव एक दिवसही जाणवल्याशिवाय जगली नाही,” डॉ कोल म्हणाले. 

“यापैकी प्रत्येक अतिरेकी हवामान घटना हवामान बदलामुळे आहे का हे विचारण्याचा टप्प्याच्या पलीकडे आपण गेलो आहोत, आणि आता शमन आणि अनुकूलन यावर लक्ष केंद्रित करायला हवे. हा प्रश्न आता कालबाह्य झाला आहे आणि हवामान समाधान शोधण्याच्या दिशेने काम करण्यापासून वारंवार विचलित होत आहे,” ते पुढे म्हणाले.

मान्सूनचा कालावधी लांबणे याकडे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून  देखील पहिले जाऊन शकते. मान्सूनमध्ये भारताच्या सभोवतालचे महासागर पूर्वीच्या तुलनेत अधिक उष्ण असतात हे वास्तव देखील एक मुख्य कारण असू शकते, असे तज्ञांनी सांगितले.

इंडियन एक्स्प्रेसने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन यांचे वक्तव्य उद्धृत केले आहे की, “…मान्सूनचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबण्याचे एक संभाव्य कारण हे असू शकते की महासागर (बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र) आता  पूर्वीपेक्षा जास्त उष्ण आहेत. …” 

“उष्ण सागरी प्रवाह मान्सून वाऱ्यांच्या निर्मितीस मदत करतात. पूर्वी, पावसाळ्यात पाऊस पडल्याने समुद्राचे तापमान कमी होत असे. परंतु अशी शक्यता आहे की जागतिक तापमानवाढीमुळे, परंपरागत पावसाळा ऋतू संपल्यानंतरही महासागर उबदार राहतात. अशा प्रकारे परंपरागत काळाच्या पलीकडे मान्सून जिवंत ठेवण्यामध्ये महासागर भूमिका बजावत असू शकतात,” राजीवन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

English

,
Anuraag Baruah
Anuraag Baruah
Articles: 11