Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

‘दिवाळीसाठी प्रदूषणरहित (ग्रीन) फटाके’ म्हणजे  दुसरे काही नसून ‘ग्रीनवॉशिंग’ आहे

वस्तुस्थिती

ग्रीनवॉशिंग. पारंपारिक फटाक्यांशी तुलना केल्यास, ‘ प्रदूषणरहित  (ग्रीन) फटाक्यांमुळे’ हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण काही प्रमाणात कमी होत असले तरीही ते मानवांसाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असतात.

ते काय म्हणतात 

प्रदूषणरहित  (ग्रीन) फटाके, पारंपरिक फटाके फोडल्याने देशातल्या विविध भागांमध्ये प्रदूषणाच्या वाढत्या पातळीला आळा घालण्यासाठी विकसित काण्यात आले होते. ते पर्यावरणपूरक आहेत आणि त्यातून मानवाला त्याचप्रमाणे पर्यावरणाला हानिकारक असलेले कण आणि विषारी पदार्थ उत्सर्जित होत नाहीत .

आम्हास काय आढळले

अलीकडे, भारतात दिवाळीदरम्यान ‘प्रदूषणरहित (ग्रीन ) फटाके’ हा एक परवलीचा शब्द बनला आहे, विशेषत: उत्तर भारतीय शहरांमध्ये जसे कि दिल्ली, जिथे वर्षाच्या या कालावधीमध्ये वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचते. पेंढा जाळल्याने होणारे प्रदूषण आणि त्यासोबत जळणाऱ्या फटाक्यांमधून उत्सर्जिय होणारे विषारी कण हे दोन्हीही, आधीच ऑटोमोबाईल्स आणि उद्योगांमुळे गंभीर प्रदूषणाखाली असलेल्या प्रदेशासाठी परिस्थिती सर्वाधिक वाईट बनवितात. त्यात प्रदूषकांना विखुरण्यापासून आणि पातळ होण्यापासून प्रतिबंधित करणारी प्रतिकूल हवामान परिस्थिती आणखीन भर टाकते

प्रदूषणरहित फटाक्यांची संकल्पना मांडतांना असा दावा करण्यात आला की ते वाढत्या प्रदूषणाच्या पातळीला आळा घालण्यास मदत करतील आणि ते पारंपारिक फटाक्यांसाठी अधिक सुरक्षित आणि प्रदूषणरहित पर्याय आहेत. प्रदूषणरहित फटाके हे PM10 आणि PM2.5, 30-35% ने कमी करून आणि सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साइड्स 35-40% ने कमी करून ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ध्वनी पातळी 120 dB पेक्षा कमी करण्यासाठी तयार केले गेले. ‘दिवाळी साजरी करण्याचा पर्यावरणपूरक उपाय’ म्हणून त्यांचा प्रचार करण्यात आला. पण, प्रदूषणरहित फटाके खरोखरच सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत का? की हा भारतीय फटाका उद्योगातील ‘ग्रीनवॉशिंग’चा प्रकार आहे?

(‘ग्रीन वॉशिंग’ म्हणजे नेमकं काय आहे याविषयी तुम्ही जाणून घेऊ इच्छिता का?  ग्रीनवॉशिंगबद्दल तुम्हाला तपशीलवार माहिती हवी आहे का? इथे CFC इंडियाद्वारे ते एस्पष्ट केलेले आहे).

काही विशिष्ट प्रमाणात प्रदूषण कमी करते

CSIR-NEERI नुसार, ज्यांनी ‘प्रदूषणरहित’ फटाक्यांसाठी सूत्र विकसित केले आहे, प्रदूषणरहित फटाके पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेत पदार्थांच्या कणांचे (PM 2.5) उत्सर्जन 30% कमी करतात. तज्ञांच्या मते, पीएम 2.5 पातळी कमी करून उत्पादनाला ‘प्रदूषणरहित’ म्हणून परिभाषित करण्याचा हा दृष्टीकोन या उत्सर्जनाच्या बहुआयामी परिणामांचा विचार करीत नाही. शिवाय, प्रदूषण 30-35% ने कमी करणे हा उत्पादन ‘प्रदूषणरहित’ किंवा ‘ पर्यावरण-पूरक’ घोषित करण्याचा निकष मानला जाऊ शकत नाही.

तज्ज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की पारंपरिक फटाक्यांप्रमाणेच प्रदूषणरहित फटाक्यांमध्ये देखील विविध प्रकारची रासायनिक विषारी संयुगे असतात, केवळ त्यांचे प्रमाण कमी असते. दी हिंदूने, CSTEP मधील वायुप्रदूषण डोमेनचे  नेतृत्व करणार्‍या संशोधन शास्त्रज्ञ प्रतिमा सिंग यांचे म्हणणे उद्घृत केले आहे, त्यांनी असे म्हटल्याचे उद्घृत केले आहे की प्रदूषणरहित फटाके कोणतेही उद्दिष्ट साध्य करीत नाहीत कारण ते देखील सूक्ष्म कण हवेत उत्सर्जित करतात.

दी हिंदू अहवालाने पुढे, श्री मधुसूदन आनंद, सीटीओ आणि सह-संस्थापक, अंबी यांचे म्हणणे उद्धृत केले की, “प्रदूषणरहित फटाके हे नेहमीच्या फटाक्यांसाठी विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय नाहीत, परंतु ते केवळ कमी उत्सर्जन करणारे आणि कमी अपायकारक पर्याय आहेत. पर्यायी प्रदूषणरहित फटाक्यांमध्ये, तसेही मॅग्नेशियम आणि बेरियम ऐवजी पोटॅशियम नायट्रेट आणि अ‍ॅल्युमिनियम सारखी हानिकारक रसायने, आणि आर्सेनिक आणि इतर हानिकारक प्रदूषकांऐवजी कार्बन असतात”

कदाचित ते पारंपरिक फटाक्यांपेक्षा अधिक धोकेदायक असू शकतात

असे समोर आले आहे की, तथाकथीन ‘प्रदूषणरहित फटाके’ कदाचित पारंपरिक फटाक्यांपेक्षा अधिक धोकेदायक असू शकतात. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) च्या अभ्यासानुसार, प्रदूषणरहित फटाके अतिशय उच्च तीव्रता असलेले अल्ट्रा-फाईन पार्टिकल्स (EFP) निर्माण करतात जे PM2.5 आणि PM10 पेक्षा खूप जास्त धोकादायक आहेत. दिवाळी 2019 च्या दरम्यान केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, खूप कमी व्यास असलेल्या सूक्ष्म कणांचे उत्सर्जन हे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत प्रदूषणरहित फटाक्यांमधून  खूप अधिक प्रमाणात होते.

डीटीयू मधील शैलेंद्र कुमार यादव, राजीव कुमार मिश्रा आणि आयआयटी-रुरकी येथील भोला राम गुर्जर यांनी केलेले संशोधन, एल्सेव्हियर या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. अति-सूक्ष्म कण अधिक धोकादायक असतात कारण ते फुफ्फुसात निक्षेपित होतात कारण त्यांच्यात ऊतकांमध्ये प्रवेश करण्याची किंवा थेट रक्तप्रवाहात शोषण्याची क्षमता असते.

ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट होत नाही  

प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, 2000 नुसार, रात्रीच्या वेळेस निवासी भागात सुरक्षित ध्वनी मर्यादा 45 डीबी आहे. नियमित फटाके सुमारे 160 dB ध्वनी उत्सर्जित करतात, तर प्रदूषणरहित फटाक्यांची ध्वनी पातळी 110-125 dB असते. ही पातळी परवानगी असलेल्या आवाज मर्यादेच्या दुपटीपेक्षा खूप अधिक आहे आणि प्रत्यक्षात ध्वनी प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करीत नाही. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, दीर्घकाळ 70 dB वरील ध्वनीच्या संपर्कामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि 120 dB पेक्षा जास्त मोठा आवाज कानाला तत्काळ नुकसान पोचवू शकतो.

बनावट

पारंपारिक फटाक्यांचे ‘प्रदूषणरहित फटाके’ असे चित्रण करून त्यांची विक्री करणे ही आणखी एक समस्या आहे. देशातील अनेक भागांमध्ये प्रदूषणरहित फटाके तयार करण्याविषयीच्या जागरूकतेचा आणि तयार करण्याच्या प्रमाणित पद्धतींचा अभाव आहे. मुंबईस्थित एक गैर-सरकारी संस्था असलेल्या (एनजीओ) आवाज फाऊंडेशनने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) पत्र लिहून ‘प्रदूषणरहित फटाक्यांच्या’ नावाने विकल्या जाणाऱ्या बनावट फटाक्यांच्या विक्रीकडे लक्ष वेधले होते. अलीकडेच हिंदुस्तान टाइम्सच्या वस्तुस्थितीत तपासणीमध्ये, लखनऊमध्ये पारंपरिक फटाके प्रदूषणरहित फटाक्यांच्या नावाने  विकले जात असल्याचे आढळून आले.  

वरील परिस्थितीत, आम्ही असा निष्कर्ष काढतो की तथाकथित ‘प्रदूषणरहित फटाके’ ‘प्रदूषणरहित’ आणि ‘पर्यावरणपूरक’ म्हणून प्रचारित करणे हे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करते जरी ते मानवांसाठी आणि पर्यावरणासाठी काही टक्क्यांनी कमी हानिकारक असले तरी ते पारंपरिक फटाक्यांइतकेच हानिकारक आहेत. अशा प्रकारे हे ‘ग्रीनवॉशिंग’कडे निर्देश करते.


(आयुषी शर्माच्या इनपुटसह)

English

,
Anuraag Baruah
Anuraag Baruah
Articles: 11