Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

हवामान बदलामुळे हिंदी महासागरात आणि आजूबाजूच्या भागांमध्ये उग्र लहरी दिवस वाढू शकतात.

अत्याधिक लहरी घटनांवरील अलीकडील संशोधनानुसार, हिंद महासागर, उत्तरी अरबी समुद्र, आणि मध्य बंगालचा उपसागर यामध्ये , वातावरणातील बदलामुळे नजीकच्या भविष्यात उग्र लहरी  दिवसांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकते. विशेषत: किनारपट्टीच्या ठिकाणी, या संशोधनामुळे  जीवित व मालमत्तेवर होणारे प्रलयंकारी परिणाम टाळण्यासाठी तातडीची चेतावणी आणि सज्ज राहण्यासाठी  मदत होऊ शकते.

हिंद महासागरात उसळणाऱ्या अत्याधिक लाटांचा उंची निर्देशांक नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सर्व्हिसेस हैद्राबाद, येथील अप्लाइड सायन्सेस डिपार्टमेंटच्या संशोधकांच्या टीमने वर्तविला आहे. संशोधकांनी त्यांच्या संशोधनात COWCLIP2.0 डाटाबेसचा वापर केला, जो, भविष्यातील लहरी हवामान वितरण वर्तमानापेक्षा नाटकीयरित्या मोठ्या प्रमाणात भिन्न असू शकते, हे दाखवण्यासाठी, “क्लायमेट डायनॅमिक्स” या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला होता.

असे या अभ्यासावरील एका प्रकाशनात म्हटले आहे की, “एनआयटी दिल्ली येथील अप्प्लाईड सायन्सेस डिपार्टमेंटच्या शास्त्रज्ञ दिव्या सरदाना आणि प्रशांत कुमार, आयआयटी खरगपूर येथील ओशन इंजिनिअरिंग आणि नेव्हल आर्किटेक्चर डिपार्टमेंटमधील प्रसाद के भास्करण आणि ESSO-इंचॉईस हैद्राबाद येथील टी. एम. बालकृष्णन नायर, यांचे  भविष्यातील अंदाज वर्तवितात की हवामान स्थिती RCP4.5 अंतर्गत (हरितगृह वायूंचा मध्यम प्रतिनिधी तीव्रता मार्ग) पूर्वेकडील उष्णकटिबंधीय हिंद महासागर, अरबी समुद्राच्या उत्तरेकडील क्षेत्र आणि मध्य बंगालच्या उपसागरावरील प्रदेश, हे उग्र लहरी दिवसांमध्ये मजबूत सकारात्मक वाढ दाखवितात”, 

प्रकाशनात पुढे असे म्हटले आहे की, “तथापि, RCP8.5 शी संबंधित उच्च उत्सर्जन स्थिती अंतर्गत, हिंद महासागरमधील बहुतांश क्षेत्रामध्ये, उत्तर अरबी समुद्रातील प्रदेश आणि दक्षिण हिंद महासागर क्षेत्रातील 48° S च्या पलीकडे अतिरिक्त-उष्णकटिबंधीय प्रदेशांचा अपवाद वगळता, उग्र लहरी दिवस कमी होण्याचा कल दिसून येण्याची शक्यता आहे”.

आकृती: RCP4.5 आणि RCP8.5 अंतर्गत आजचा कालावधी (1979-2004) आणि भविष्यातील कालावधी (2081-2100) यामधील अत्यंत लहरी निर्देशांकांचे हवामानशास्त्र

अभ्यासात असेही आढळून आले की, उग्र लहरी दिवसांमधील बदल दक्षिण हिंदी महासागरामधील RCP 4.5 आणि 8.5 या दोन्ही परिस्थितींमध्ये, अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे, आणि लहरींचा वादळ  कालावधी, उत्तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, आग्नेय हिंद महासागर आणि दक्षिण हिंद महासागरावर RCP8.5 दबावाच्या स्थितीत मजबूत होताना आढळत.

अभ्यासानुसार, दक्षिण गोलार्धातील उच्च-वारंवारिता तीव्र लहरी घटना वाढण्यात बदल हे समुद्र पातळीच्या दाब निर्माण करणाऱ्या घटकांमधील बदलांमुळे होत आहेत, जे एकविसाव्या शतकाच्या कालावधीसाठी SAM च्या (सदर्न अ‍ॅन्युलर मोड) अंदाजानुसार आहेत.

अभ्यासापासून झालेला लाभ

किनारपट्टीवरील लोकांना लाभ होऊ शकेल अशा लघु कालावधीच्या आणि दीर्घ  कालावधीच्या योजनांसाठी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संलग्न असलेल्या सायन्स रिसर्च अँड इंजिनिअरिंग बोर्ड द्वारे अर्थसहाय्यित संशोधन, धोरणकर्त्या आणि निर्णायकर्त्या अधिकाऱ्यांना अतिशय सहाय्य्यभुत होऊ शकते.

अतिशय लहरी घटना, ज्या हल्ली त्यामानाने नियमितपणे दिसून आल्या, त्यांच्यामुळे मूलभूत सुविधा, सागरी उपक्रम आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचे जीवन, लक्षणीयरीत्या प्रभावित होऊ शकते. किनार्‍यावरील परिवर्तन, धूप दर, पुराच्या घटना आणि इतर संबंधित किनारपट्टीवरील धोके हे सर्व, लक्षणीय परिवर्तनशीलता आणि तीव्र लाटांच्या घटनांमध्ये दिसून आलेल्या बदलामुळे तसेच वादळाची तीव्रता आणि मार्ग बदलण्यामुळे, लक्षणीयरीत्या प्रभावित होऊ शकतात.हवामान बदलामुळे आलेल्या अत्यंत लाटा आणि त्यांचे परिणाम अजूनही क्षेत्रीय आणि जगातील पातळीवर वाढत आहेत. म्हणून, परिणामकारक किनारपट्टी योजना आणि व्यवस्थापन, तसेच वेळेवर चेतावणी, उच्च-वारंवारता अत्यंत लहरी घटनांच्या वाढत्या तीव्रतेमध्ये होणारे अपेक्षित बदल चांगल्या रितीने समजून घेणे, आवश्यक आहे.

Also, read this in English

,
सीएफसी इंडिया
सीएफसी इंडिया
Articles: 74