Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

इलेक्ट्रिक वाहने उत्सर्जनाचे उच्चाटन करत नाहीत तर त्याला इतरत्र निर्यात करतात. चूक किंवा बरोबर?

आम्हाला एक प्रसारित होत असलेले यु ट्यूब रील आढळले, त्यात दावा करण्यात आला आहे की इलेक्ट्रिक वाहने उत्सर्जनाचे उच्चाटन करत नाहीत तर त्याला इतरत्र निर्यात करतात. त्याच व्हिडिओमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बाबतीत विविध संशयास्पद दावे केलेले दिसून आले, म्हणून आम्ही सविस्तर तथ्य तपासणी करायचे ठरविले. आम्हाला आढळून आले की बहुतांश दावे हे एकतर खोटे आहेत किंवा दिशाभूल करणारे आहेत.

व्हिडिओमधील दावे

व्हिडिओमधील व्यक्ती दावा करते की शून्य-उत्सर्जन वाहन अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. “खरा प्रश्न हा आहे की इलेक्ट्रिक करशी संबंधित उत्सर्जन कुठे आहे? तुमचे इलेक्ट्रिक वाहन उत्सर्जन करत नाही मग ते तुम्ही त्याचे काय करता, तर तुम्ही ते इतरत्र कुठेतरी निर्यात करता. एक 100 पौंडाची बॅटरी तयार करण्याकरता तुम्हाला 500,000 पाउंड सामग्री खोदून काढावी लागते. 1 बॅरल तेलाएवढी ऊर्जा पकडून ठेऊ शकणारी बॅटरी तयार करण्यासाठी 10 ते 30 बॅरल तेल लागते. केवळ एक बॅटरी तयार करण्यामध्ये 10 ते 40 टन कार्बन डायऑक्साईड इतका कार्बन डेबट दर असू शकतो. आणि बॅटरीचा वापर वाढावा यासाठीच्या असलेल्या योजनांसाठी लिथ्यम, कोबाल्ट आणि झिंक यासारख्या खनिजांचे उत्पादन वाढवावे लागेल. या खनिजांची मागणी 400% ते 4000% इतकी वाढू शकते. जगामध्ये इतक्या पुरेशा खाणी नाहीत की लोकांनी प्रत्येक कारसाठी एक बॅटरी विकत घ्यावी एवढ्या पुरेशा बॅटरी बनु शकतील,” असे व्हिडिओमधील व्यक्ती म्हणते. 

दावा

1 बॅरल तेलाएवढी ऊर्जा पकडून ठेऊ शकणारी बॅटरी तयार करण्यासाठी 10 ते 30 बॅरल तेल लागते. केवळ एक बॅटरी तयार करण्यामध्ये 10 ते 40 टन कार्बन डायऑक्साईड इतका कार्बन डेबट दर असू शकतो.

वस्तुस्थिती 

दिशाभूल करणारा. 1 बॅरल तेलाएवढी ऊर्जा पकडून ठेऊ शकणारी बॅटरी तयार करण्यासाठी 1 ते 3 बॅरल तेल लागते. परंतु दीर्घकाळासाठी, बॅटरीवर-समर्थित वाहन हा एक कार्यक्षम आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक व्यवहार्य पर्याय आहे. What We Found

द गार्डियन मध्ये  प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जीवाष्म इंधन कार्स या त्यांच्याच क्षमतेच्या बॅटरी-समर्थित कार पेक्षा शेकडो पट अधिक अधिक कच्ची सामग्री वाया घालवतात, त्यात पुरावा देण्यात आला आहे की पेटतील आणि डिझेल कार आपण न वापरल्यास त्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. 

जर पुनर्प्रक्रियेचा विचार केला तर लिथियम-आयर्न जर आपण बॅटरी-समर्थित इलेक्ट्रिक कारमध्ये वापरली तर लिथियम-आयर्न बॅटरीच्या जीवनकालावधीत केवळ 30 किलो कच्चा माल वाया जातो. ट्रान्सपोर्ट अँड एन्व्हायर्नमेंट या युरोपियन संशोधन आणि मोहीम गटाच्या विश्लेषणावर आधारित गार्डियन अहवालानुसार हे 17,000 लिटर तेलाच्या तुलनेत आहे. 

“आमच्या आधीच्या विश्लेषणाने दाखवून दिले आहे कि इलेक्ट्रिक वाहने 64% कमी कार्बन दया ओक्साडी उत्सर्जित करतात, यामध्ये वीज निर्मिती आणि इंधन उत्पादन यासारख्या विविध टप्प्यांचा समावेश आहे. तथापि, इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात कच्ची सामग्री वापरतात हे म्हणणे खोडुन टाकले गेलेले नाही”, असे T&E मधील वाहतूक विश्लेषक आणि अहवालाचे लेखक, ल्युसियन मॅथ्यू यांनी द गार्डियनला सांगितले. “आमचे विश्लेषण दर्शविते की इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीची लागणारी कच्ची सामग्री जीवाष्म इंधन कारने जळालेल्या इंधनाच्या तुलनेत खूप कमी आहे, जे बॅटरीच्या विपरीत, पुनर्वापर करता येत नाही.”

जीवाष्म इंजिन/बॅटरीच्या कॅल्क्युलेशनमध्ये वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या सामग्रीचा समावेश नाही, कारण हे, इंधन उत्खनन कार्यक्षमता आणि राष्ट्रीय वीज मिश्रण यांसारख्या घटकांवर अवलंबून आहे. विश्लेषण असेही दर्शविते की अपस्ट्रीम ऊर्जेने (जी वीज निर्मिती करते आणि त्या वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पॅनेल्स आणि टर्बाइन्स तयार करते) असे दर्शविले आहे की त्यात अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या एकूण ऊर्जा उपभोगामध्ये 5% ते 10% इतकाच फरक पडतो”.

अन्य पैलूंवर, इलेक्ट्रिक वाहने हे ऊर्जा कार्यक्षमता, कच्च्या मालाची मागणी किंवा किंमत या सर्व बाबींमध्ये त्यांचे समकक्ष पेट्रोल आणि डिझेल वाहने यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानली जातात. तसेच, यामुळे कार्बन डायऑक्साइडसह बाहेर टाकल्या जाणाऱ्या हानिकारक वायूंचे उत्सर्जन दूर होण्यास मदत होईल.

तसेच बॅटरी तंत्रज्ञानामध्ये होणारा विकास हा प्रत्येक कार साठी आवश्यक लिथियम, कोबाल्ट आणि निकेल याची सरासरी गरज कमी कारे. यामुळे वाढती मागणी काही प्रमाणात पूर्ण होईल तसेच या कारच्या किमती देखील कमी होतील. त्याशिवाय, सर्क्युलर अर्थव्यवस्थेचे नियम ज्यांना उच्च पुनर्प्रक्रिया  दरांची आवश्यकता आहे, ते मागणी कमी करू शकतात

दावा

बॅटरी उत्पादनास आवश्यक खनिजांची मागणी 400% ते  4000% पर्यंत वाढेल. 

वस्तुस्थिती 

दिशाभूल करणारा. कोणताही तपशिलाचा स्रोत या माहितीचा पाठपुरावा करीत नाही. कोणत्या कालावधीसाठी ही वाढ अपेक्षित आहे तो कालावधी त्यांनी नमूद केलेला नाही. तसेच जेंव्हा ते  400% आणि 4000% च्या दरम्यान वाढीबद्दल बोलत आहेत तेंव्हा त्यांनी कोणत्या खनिजांचा संदर्भ घेतले आहे ते नमूद केलेले नाही.

दावा

जगामध्ये इतक्या पुरेशा खाणी नाहीत की लोकांनी प्रत्येक कारसाठी एक बॅटरी विकत घ्यावी एवढ्या पुरेशा बॅटरी बनु शकतील

वस्तुस्थिती 

लोकांनी प्रत्येक कारसाठी एक बॅटरी विकत घ्यावी एवढ्या पुरेशा बॅटरी बनु शकतील इतके पुरेसे खनिज उपलब्ध आहे. ही खनिजे प्राथमिकतः खालील दोन स्त्रोतांद्वारे पुरविली जातात: 1) नवीन  उत्खनन 2) आधीपासून वापरात असलेल्या बॅटरींवर पुनर्प्रक्रिया करून पुनर्प्राप्त केलेले.

आम्हाला काय आढळले

वाटेवर बदलासाठी जबाबदार असलेले उत्सर्जन कमी करण्याकरिता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये संक्रमित होणे आवश्यक आहे. जसजसे उपयोजन वाढत जाईल, तसतसे लिथियम, कोबाल्ट आणि निकेल सारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी सामग्रीची मागणी वाढेल. ही खनिजे प्राथमिकतः खालील दोन स्त्रोतांद्वारे पुरविली जातात: 

1) नवीन उत्खनन, किंवा 

2) आधीपासून वापरात असलेल्या बॅटरींवर पुनर्प्रक्रिया करून पुनर्प्राप्त केलेले.

पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीच्या वापरामुळे पर्यावरणावरील परिणाम लक्षणीयरीत्या कमी होतो. नवीन उत्खनन केलेल्या सामग्रीसाठी देखील हा एक व्यवहार्य पर्याय आहे. यासाठी जरी सामग्री आधीच खोदून काढण्याची,  बॅटरीमध्ये उत्पादित केली असण्याची आणि शेवटी वापरातून काढून टाकण्याची, आवश्यकता असली तरी.

संशोधनावरून असे दिसून येते की, मोठ्या प्रमाणात बॅटरी पुनर्प्रक्रिया झाल्यास जागतिक वाहतूक क्षेत्राचे, सद्य तंत्रज्ञान वापरून, विद्युतीकरण करण्यासाठी पुरेसे शोधलेले साठे आहेत. अशा परिस्थितीत, 2100 मध्ये जागतिक मागणी ही 55% कोबाल्ट साठे आणि 50% लिथियम साठे इतकी असेल. 

जर पुनर्प्रक्रिया उत्पादनाशी जुळत नसेल, तर लिथियम, निकेल किंवा कोबाल्ट सारख्या खनिजांची कमतरता भासू शकते कारण उत्खननासाठी आर्थिकदृष्ट्या उपलब्धतेपेक्षा मागणी जास्त असेल. अशा परिस्थितीनुसार वर्ष 2060 मध्ये मागणी कोबाल्ट साठ्यांपेक्षा अधिक असेल आणि सध्याच्या लिथियम साठ्याच्या 90% असेल. या साठ्यात घट झाल्यामुळे सामग्रीची किंमत वाढ होऊन, शोध घेण्यास  आणि विकास करण्यास चालना मिळेल आणि संभाव्य sसाठ्यांचा विस्तार होईल.

खनन करण्यादरम्यान संसाधनांच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करणारे शास्त्रज्ञ दोन श्रेणी शोधतात: एकूण उपलब्ध संसाधने आणि खनिज साठे. हा फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे कारण साठे हे जागतिक संसाधन दर्शवितात जे खनन करण्यासाठी परवडणारे आहेत, तर एकूण संसाधने मर्यादित जागतिक संसाधनांचे अंदाजे मूल्य दर्शवतात. एकूण संसाधनांच्या तुलनेत राखीव अंदाज कमी प्रमाणात उपलब्ध आहेत जे खनिज उत्खनन, सामग्री मूल्य आणि तांत्रिक प्रगती यांच्या आधारावर देखील चढ-उतार होतात. पुनर्प्रक्रियेमुळे नवीन खाणींच्या गरजा खूप प्रमाणात कमी होऊ शकतात आणि शाश्वत, सुरक्षित आणि परवडणारे विद्युतीकरण निर्माण करण्यासाठी हे एक आवश्यक धोरण आहे.  

पुनर्प्रक्रिया कशामुळे अधिक टिकून राहते ?

पुनर्प्रक्रीया केलेली सामग्री वापरल्याने पर्यावरणावरील परिणाम कमी होतात, हे परिणाम नवीन उत्खननापेक्षा खूप कमी असतात. पुनर्प्रक्रियेनंतर प्राप्त केलेली ही महत्वाची सामग्री आधीपासूनच अर्थव्यवस्थेत उपस्थित आहे. केवळ त्यांच्या उत्पादनाशी संलग्न परिणाम बॅटरी पुनर्प्रक्रियेसाठी वाहतूक करण्यापासून, पूर्व-प्रक्रिया आणि पुनर्प्रक्रीया  यांच्यापासून उद्भवतात. हवामानात करणाऱ्या हरित वायूचे कमी होण्याचे प्रमाण 64% आहे, जेंव्हा आपण नवीन ऐवजी पुनर्प्रक्रीया केलेली सामग्री वापरतो. धूर निर्माण करणारे उत्सर्जन आणि मानवी आरोग्यावर परिणाम करणारे उत्सर्जन देखील कमी केले जाऊ शकते ज्यामध्ये सल्फर ऑक्साईडची पातळी 89% आणि नायट्रोजन ऑक्साईड 78% ने कमी केली जाते.

पुनर्प्रक्रीया केलेल्या सामग्रीपासून किती मागणी पूर्ण होऊ शकते?

युनायटेड स्टेट्सवर लक्ष केंद्रित केलेल्या अभ्यासानुसार, पुनर्प्रक्रीया केलेल्या सामग्रीपासून भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची सामग्रीची मागणी पूर्ण केली जाऊ शकते. 2050 मध्ये, पुनर्प्राप्त केलेली सामग्री इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीसाठी साधारणपणे 45–52% कोबाल्ट, 40–46% निकेल, आणि 22–27% लिथियम एवढा पुरवठा करू शकते. जर आपण कमी कालावधीच्या दृष्टीने पहिले तर, पुनर्प्रक्रीया केलेली सामग्री थोड्या प्रमाणात बॅटरी सामग्री दर्शवेल. तथापि, अर्थव्यवस्थेत अधिक साहित्य आल्यामुळे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी वापरातून काढून टाकल्यामुळे संख्या वाढते.(आयुषी शर्माच्या इनपुटसह)

Also, read this in English

सीएफसी इंडिया
सीएफसी इंडिया
Articles: 74