Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
दावा
ग्लोबल वॉर्मिंग असे काहीही नसते, अन्यथा हिवाळे एवढे थंड राहिले नसते
वस्तुस्थिती
ग्लोबल वार्मिंगमुळे हिवाळा अधिक थंड आणि तीव्र होऊ शकतो.
ते काय दावा करतात
सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट्स आल्या आहेत ज्यात दावा केला आहे की ग्लोबल वॉर्मिंग वास्तविक नाही कारण अन्यथा, जगाच्या बहुतांश भागांमध्ये हिवाळे इतके तीव्र झाले नसते. अशा प्रकारच्या पोस्ट्स बहुतेक प्रदेशांमध्ये आढळतात जेंव्हा जेव्हा हिवाळा ऋतूमुळे या ठिकाणचे स्थानिक तापमान कमी होते.
त्यांना काय आढळले
ग्लोबल वार्मिंगमुळे हिवाळा अधिक थंड आणि तीव्र होऊ शकतो. 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, आर्क्टिकमधील तापमानवाढीमुळे स्थिरावरणाच्या ध्रुवीय आवर्तामध्ये विस्कळीतपणा येतो. हा विस्कळीतपणा उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील काही भागातील अत्यंत थंड हवामानाशी संबंधित आहे.
ध्रुवीय आवर्त म्हणजे काय आहे? त्याच्यामूले काही प्रदेशांमध्ये अधिक थंड हिवाळा कसा काय होतो?
ध्रुवीय आवर्त म्हणजे कमी दाबाचे कसेतर असते- वहाणाऱ्या थंड हवेचा अफाट विस्तार-जो ध्रुवीय प्रदेशात स्थिरावतो. हिवाळ्यामध्ये, उत्तर ध्रुवावरील ध्रुवीय आवरत विस्तारते, आणि ते थंड हवा दक्षिणेकडे पाठवते. हे नियमितपणे घडते आणि बहुतेकदा युनायटेड स्टेट्समधील थंड तापमानाच्या उद्रेकाशी संबंधित असते.
नॅशनल ओशियानिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन, यूएसए नुसार, एक स्थिर ध्रुवीय आवर्त सामान्यतः उत्तरेच्या टोकाकडे असते आणि थंड हवा सामान्यत: पश्चिमेकडून पूर्वेकडे वहाते. परंतु एक विस्कळीत ध्रुवीय आवर्त वेगळ्या पद्धतीने कार्य करते – ते अधिक दक्षिणेकडे जाऊ शकते आणि हवा अधिक लहरी आकृतिबंधाने वाहू शकते.
प्रतिमास्रोत: NOAA
हिवाळ्यादरम्यान, उत्तर ध्रुवाकडील ध्रुवीय आवर्ताचा विस्तार होतो, ज्यामुळे थंड हवा दक्षिणेकडे पाठवली जाते. हे बहुतांशी नेहमी घडते आणि ते जगाच्या काही भागांमध्ये थंड तापमानाच्या होणाऱ्या उद्रेकाशी संबंधित असू शकते.
दक्षिणेतील सर्व थंड हवामान ध्रुवीय आवर्ताचा परिणाम आहे का?
उत्तर नाही असे आहे. सर्व थंड हवामान ध्रुवीय आवर्ताकडून येत नाही. जरी ध्रुवीय आवर्तामधून थंड हवा दक्षिणेकडे ढकलली जाऊ शकत असली, तरी ती सामान्यत: ध्रुवीय प्रदेशात स्थिर रहाते. आवर्त कमकुवत होण्यासाठी किंवा दक्षिणेकडे स्थलांतरित होण्यासाठी खूपच असामान्य परिस्थिती असावी लागते. अन्य हवामान परिस्थिती थंड आर्क्टिक हवामान अगदी दक्षिणेकडे प्रवास करायला लावू शकते.
थंड हवामानासाठी जबाबदार अन्य घटना
ग्लोबल वॉर्मिंग अन्य मार्गांनी देखील हिवाळ्यातील हवामान तीव्र करू शकते. उबदार तापमान म्हणजे उबदार वातावरण. नॅशनल जिओग्राफिकच्या अभ्यासानुसार, जेव्हा वातावरण उबदार असते तेव्हा ते जास्त आर्द्रता धरून ठेवते ज्यामुळे पर्जन्यवृष्टी वाढते – म्हणून जेव्हा तापमान गोठण बिंदूच्या खाली असते तेव्हा अधिक बर्फवृष्टी होते. यामुळे हे हिमवादळे अधिक तीव्र करू शकते.
भारतीय संदर्भ
तसेच, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अलीकडील अभ्यासानुसार, प्रायद्वीपीय भारताच्या अनेक भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा कमी कमाल तापमान असण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली ला निना घटना हे त्याचे कारण असल्याचे आयएमडीला आढळले. IMD च्या अलीकडील अहवालात असे नमूद केले आहे की, “MMCFS आणि इतर जागतिक मॉडेल्सच्या ताज्या अंदाजानुसार असे सूचित होते की आगामी हिवाळी ऋतूमध्ये ला निना परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पॅसिफिकवरील एल निनो-सदर्न दोलायमान (ENSO) परिस्थिती व्यतिरिक्त, इतर घटक जसे की हिंद महासागर SSTs देखील भारतीय हवामानावर प्रभाव टाकतात”.
प्रतिमास्रोत: IMD
IMD द्वारे दाखवलेला नकाशा डिसेंबर 2022 मध्ये किमान तापमानाच्या संभाव्यतेच अंदाज दर्शवितो. निळ्या रंगाचा प्रदेश किमान तापमान दर्शवतो. दक्षिण भारतात यावर्षी सामान्यपेक्षा अधिक थंड हिवाळ्याची अपेक्षा आहे.
अशा प्रकारे, एक अत्यंत थंड हिवाळा प्रत्यक्षात ग्लोबल वॉर्मिंगमुळे होऊ शकतो, व आपण जगात कुठे आहात यावर ते अवलंबून असू शकते. हिवाळ्यात तापमान अजूनही एकंदरीत उबदार होण्याची अपेक्षा असताना, इतर शक्यतांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण ते आपल्याला हवामानातील बदलामुळे आपल्यावर काय परिणाम करू शकतात हे सर्व समजून घेण्यास मदत करू शकते.
ही चिंता कशासाठी?
काही प्रदेशांमध्ये तीव्र हिवाळ्यातील हवामान म्हणजे एक किंवा दोन दिवसांकरिता थोडेसे थंड तापमान असे नसते. हे अत्यंत थंड तापमान आणि कडक हिवाळ्यातील वादळांचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
सामान्य हवामानापेक्षा थंड हवामानाचा परिणाम आरोग्यावर होतो. थंड हवामानात, शरीर विशिष्ट भागांमध्ये रक्त प्रवाह वाढवते (महत्वाच्या अवयवांना उबदार ठेवण्यासाठी), रक्तवाहिन्या घट्ट करते आणि तुमच्या टोकाच्या भागांमध्ये (हातपायांमध्ये) रक्त प्रवाह कमी करते. त्याचा पीक हंगामावरही अपरिमित प्रकारे परिणाम होतो. दक्षिण भारतातील सामान्य तापमानापेक्षा जास्त थंडी वनस्पतींच्या एन्झाइमची क्रिया कमी करू शकते. हे वनस्पतींद्वारे पोषक आहार घेण्यात देखील व्यत्यय आणते कारण झाडे मातीसाठी सभोवतालची सामग्री पचवण्यासाठी एंजाइम स्रवतात. परिणामी, थंड तापमानामुळे रोपांची वाढ खुंटते आणि त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
(आयुषी शर्माच्या इनपुटसह)