Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
दावा
ऑगस्ट 29 , 2022 रोजी, ग्रीनलँडमध्ये 7 Gt बर्फाची भर पडली यावरून असे सिद्ध होते की ग्रीनलँडमधील बर्फाचे प्रमाण कमी होत नसून वाढत आहे.
वस्तुस्थिती
एकंदरीतच ग्रीनलँडमधील बर्फ कमी होतआहे. जो 7 Gt बर्फ जमा झाला आहे ते म्हणजे वस्तुतः पृष्ठभागावरील बर्फाच्या प्रमाणातील वाढ होती आणि टोटल मास बॅलन्स इतकी नव्हती (एकंदर बर्फ जमा होणे किंवा कमी होणे) जो या प्रकरणामध्ये सप्टेंबर 2021 पासून ते ऑगस्ट 2022 या दरम्यान साधारण 84Gt बर्फ कमी झाला आहे.
ते काय म्हणतात
इलेक्ट्रोव्हर्स नावाच्या प्रोफाईलने ‘#क्लायमेट स्कॅम’ हॅशटॅग वापरून पोस्ट केलेले ट्विटर व्हायरल झाले आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की ऑगस्ट 29, 2022 रोजी, ग्रीनलँडला 7 Gt बर्फाचा लाभ झाला, जे सिद्ध करते की ग्रीनलँडमधील बर्फाचे प्रमाण कमी होत नसून वाढत आहे. इलेक्ट्रोव्हर्सचा एक लेख देखील व्हायरल झालेल्या ट्विटर पोस्टमध्ये अभिप्राय म्हणून प्रोफाईलद्वारे सामायिक करण्यात आला आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की ग्रीनलँडमधील बर्फ कमी होण्याचा कल उलट झाला आहे, जवळपास संपूर्णपणे.
ट्विटर पोस्ट:
आम्हाला काय आढळले
हवामान नाकारणारे अनेक जण अलीकडेच असा दावा करीत आहेत की ग्रीनलँडला अलीकडच्या वर्षांमध्ये बर्फाचा लाभ झाला आहे आणि बर्फ कमी होण्याबाबतचा कल उलट झाला आहे. ते असा देखील दावा करतात की ग्रीनलँडमध्ये एकूणच बर्फाचा निव्वळ लाभ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे दावे करण्यासाठी ते विविध वैज्ञानिक निष्कर्षांचा दुरुपयोग करतात किंवा वैज्ञानिक अहवाल, साधने आणि विश्लेषण यामागील विज्ञानाविषयी गैरसमज करून घेतात.
एक पुनरावृत्ती गुन्हेगार
सुरुवात करतांना हे नमूद करणे आवश्यक आहे की, हवामानाविषयी चुकीची माहिती पसरविण्याचा दृष्टीने ट्विटर प्रोफाइल आणि ‘इलेक्ट्रोव्हर्स’ हे संकेतस्थळ पुनरावृत्ती गुन्हेगार आहे. असाच एक दावा आम्ही खोडून काढला आहे, ज्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग होत नाही आणि पृथ्वी खरोखर आपल्याला वाटते त्यापेक्ष जास्त थंड आहे असा दावा करण्यासाठी मेन विद्यापीठाचे वैज्ञानिक साधन, इलेक्ट्रोव्हर्सद्वारे चुकीच्या पद्धतीने उदाहरणादाखल सादर करण्यात आले होते. इलेक्ट्रोव्हर्सच्या दाव्याबाबत यूएसए टुडेने केलेली आणखी एक तथ्य तपासणी पुढे सिद्ध करते की, इलेक्ट्रोव्हर्सने याआधीही हवामानाबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे.
पोलर पोर्टल
ज्याविषयी प्रश्न आहे त्या व्हायरल ट्विटर पोस्टकडे येत असताना, आमच्या लक्षात आले की त्यांनी एक नकाशा उदाहरणादाखल सादर केला आहे जो नकाशा काही वैज्ञानिक साधनाचे अंतिम उत्पादन असल्याचे दिसते. नकाशावर आम्हाला ‘सरफेस मास बॅलन्स, आणि तारीख ‘ऑगस्ट 29 2022’, असे शब्द आढळून आले.
यूएसए टुडेच्या आजच्या वस्तुस्थिती तपासणीचा आधार घेतला असता, आम्हाला आढळून आले की ते पोलर पोर्टलच्या वैशिष्ट्याचा वापर करून प्राप्त केले गेले आहे, ज्याची सुरुवात डॅनिश संशोधन संस्थांनी त्यांच्या ग्रीनलँड बर्फाच्या थराचे आणि आर्क्टिक समुद्रातील बर्फाच्या निरीक्षणाचे परिणाम प्रदर्शित करण्यासाठी केली.
आम्ही पोलर पोर्टल संकेतस्थळाचा ‘सर्फेस कंडिशन’ हा विभाग पहिला आणि आणि त्याची इनपुट तारीख ‘ऑगस्ट 29, 2022’ पहिली, त्यावरून आम्हाला व्हायरल ट्विटर पोस्टवर तंतोतंत सारखाच नकाशा उदाहरणादाखल सादर केलेला दिसला.
आम्ही ‘कृपया हा मजकूर अवश्य वाचा!’ हा विभाग पाहिला ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की तो विशिष्ट नकाशा सर्फेस मास बॅलन्स (SMB) दर्शवित आहे, आणि टोटल मास बॅलन्स (TMB), जो बर्फाचा एकंदर लाभ किंवा बर्फ कमी झाला आहे, त्यासोबत त्याची गल्लत केली जाऊ नये.
त्या विभागात असे लिहिले आहे की ‘ग्रीनलँड बर्फाच्या थराच्या पृष्ठभागावर दररोज बर्फाचे प्रमाण कसे वाढते आणि कमी होते ते हा नकाशा स्पष्ट करतो. हिमवर्षाव आणि पृष्ठवाह यातील फरक हा सर्फेस मास बॅलन्स म्हणून ओळखला जातो. एका वर्षाच्या कालावधीत तो नेहमीच धन असतो कारण वर्षाव झालेला सर्वच्या सर्व बर्फ पुन्हा बर्फाच्या थरामधून पृष्ठवाहीत होत नाही.
विभागात पुढे असेही म्हटले आहे की, ‘सर्फेस मास बॅलन्स हा टोटल मास बॅलन्ससच्या (म्हणजेच आईस कॅपचा एकंदर लाभ किंवा कमी होणे) समान नसतो, ज्यामध्ये ज्यामध्ये ग्लेशीयरद्वारे हिमनग विघटित झाल्यावर, जिभेच्या आकाराचा हिमनग उबदार समुद्राच्या संपर्कात आल्यावर वितळल्यावर, उबदार समुद्राचे पाणी आणि बर्फाच्या थराच्या तळाशी घर्षण आणि इतर प्रभाव, यामुळे कमी झालेल्या बर्फाच्या प्रमाणाचा समावेश होतो.
तज्ज्ञ काय म्हणतात?
पुढे, आम्ही वरीष्ठ हवामान वैज्ञानिक असलेल्या डॉ. मार्टिन स्टेनडेल, जे पोलर पोर्टलचे प्रकाशक देखील आहेत, यांच्याशी नॅशनल सेंटर फॉर क्लायमेट रिसर्च, डॅनिश मेटिऑरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, इथे संपर्क साधला. डॉ. स्टेनडेल यांनी या गोष्टीची आम्हाला पुष्टी केली की ‘ग्रीनलँडला मोठ्या प्रमाणात बर्फाचा लाभ होत आहे’ हा दावा चुकीचा आहे आणि प्रत्यक्षात ग्रीनलँडमधून वर्ष १९९७ पासून दरवर्षी सलग २६ वर्ष बर्फ कमी होत आहे आणि सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीदरम्यान सुमारे 84Gt बर्फ कमी झाला आहे.
या वरिष्ठ हवामान वैज्ञानिकाने आम्हाला पाठविलेल्या इमेलमध्ये स्पष्ट केले की:
आपल्याला ग्रीनलँड आईस शीटच्या टोटल मास बॅलन्सचे (TMB) मूल्यांकन करायचे असेल तर आपल्याला आईस कॅपवर (सर्फेस मास बॅलन्स SMB), आईस कॅपच्या कडांवर (मरीन मास बॅलन्स MMB), आणि आईस कॅपच्या खाली (बेसल मास बॅलन्स BMB) काय घडत आहे त्याचा विचार करावा लागेल.
अशाप्रकारे TMB = SMB + MMB + BMB
बर्फाच्या थरावर बर्फाचे प्रमाण वाढते त्यावेळी या संज्ञा धन असतात आणि जेंव्हा बर्फाच्या थरातून बर्फ कमी होतो त्यावेळी ऋण असतात. तद्वतच, किमान काही वर्षांच्या सरासरीनंतर TMB शून्य असायला हवे.
SMB म्हणजे, हिमवर्षावामुळे बर्फाच्या प्रमाणात झालेला लाभ आणि समुद्रात वाहून गेल्यामुळे कमी झालेला बर्फ यातील फरक. तो नेहमी धन असतो.
MMB म्हणजे हिमनग विघटित झाल्यामुळे आणि जिभेच्या आकाराचे हिमनग समुद्राच्या (साधारण्पणे) उबदार पाण्याच्या संपर्कात आल्यावर वितळल्यावर बर्फाच्या थरामधून कमी होणारा बर्फ. तो नेहमी ऋण असतो.
BMB म्हणजे घर्षणामुळे, जमिनीतील उष्ण प्रवाहामुळे आणि इतर काही घटकांद्वारे जो बर्फ कमी झाला तो. तो तुलनेने कमी असतो परंतु नेहमी ऋण असतो.
वरील आकृती SMB, MMB आणि BMB या संज्ञांची तसेच त्यांच्या TMB च्या बेरजेची सरासरी दर्शविते.
Mankoff et al. (2021) मधील आकृती 2 ची ही सुधारित आणि पुन्हा काढलेली आवृत्ती आहे.
इथे आपल्याला दिसते की:
(1) आईस कॅपला बर्फाचा लाभ होण्याची एकमेव शक्यता ही SMB द्वारे असते, म्हणजे हिमवर्षावाद्वारे. अन्य घटक MMB आणि BMB हे नेहमी ऋण असतात, म्हणून बर्फ पृष्ठवाहीत झाल्यानंतर झालेला अधिकचा हिमवर्षाव आणि दोन अन्य घटक पुरेसे मोठे असणे आवश्यक असते.
(2) TMB मधील परिवर्तनशीलता प्रामुख्याने SMB मधील परिवर्तनशीलतेमुळे, म्हणजे हवामानामुळे होते. कोरड्या आणि उबदार वर्षांमध्ये, SMB किरकोळ धन असते, जसे की 2012 प्रमाणे. तुलनेने थंड आणि ओल्या वर्षांमध्ये, म्हणजे वर्ष 2018 प्रमाणे, SMB मोठे असते.
(3) हिमनगाच्या विघटनामुळे आणि जिभेच्या आकाराच्या हिमनगाच्या वितळण्यामुळे आईस कॅप मधून बर्फ कमी होतो आणि कालांतराने हे नुकसान किंचित वाढले आहे.
(4) आईस कॅपच्या खालून योगदान कमी असते, परंतु शून्य नसते.
(5) वर्ष 1997 पासून प्रत्येक वर्षी TMB ऋण असते (म्हणजे आईस मधून बर्फ गमावला आहे). म्हणजे सलग 26 वर्ष.
तो सर्व डेटा किती विश्वासार्ह आहे?
डेटा विश्वासार्ह आहे, याची डॉ. स्टेनडेल यांनी पुष्टी केली. “GRACE” या उपग्रहांद्वारे, आपण टोटल मास बॅलन्सचा स्वतंत्रपणे अंदाज करू शकतो. तथापि, उपग्रहांद्वारे प्रथम मोजला जात असलेला गुरुत्वाकर्षणातील लहानसा फरक हा प्रमाणातील बदल म्हणून व्यक्त केला पाहिजे, आणि हेच कारण आहे की ज्यामुळे GRACE डेटा नेहमीच काही महिने मागे असतो”, असे त्यांनी सांगितले.
MMB, म्हणजे जो विघटनामुळे आणि पाण्याखालील वितळण्यामुळे कमी होत असलेला बर्फ आहे, त्याचा अंदाज केला जाऊ शकतो. “उपग्रहांचा वापर करून, आपण बर्फाच्या थरावरील नियंत्रण बिंदूंमधून बर्फ किती वेगाने वाहतो हे मोजू शकतो जिथे आपल्याला बर्फाची जाडी आणि आकार माहित आहे. अशाप्रकारे आपण MMB चा अंदाज करू शकतो. हा डेटा उघडपणे उपलब्ध आहे, ज्यामुळे आपल्याला संपूर्ण बर्फाच्या थराच्या बजेटचे निरीक्षण करता येते,” असे डॉ स्टेनडेल पुढे म्हणाले. “1 एप्रिल 2002 ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत, जो कालावधी दोन्ही डेटासेटसाठी समान आहे, ग्रीनलँड आइस शीट मधून अंदाजे 4500 Gt बर्फ कमी झाला आहे. हे ग्रीनलँड बर्फाच्या थरापासून जागतिक सरासरी समुद्र पातळी 1.3 सेमी वाढण्या इतके आहे. आपण याची नोंद घेतो की दोन्ही पद्धती एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहेत. ”डॉ. स्टेनडेल पुढे म्हणाले.