Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

पोस्ट्स, हवामान बदल हा घोटाळा असल्याचा दावा करण्यासाठी, उत्तर गोलार्धातील बर्फाच्या आच्छादनात थोडी वाढ झाली असल्याचा हवाला देतात

दावा 

उत्तर गोलार्धातील बर्फाच्या आच्छादनातील विक्रमी वाढ हे सिद्ध करते की ग्लोबल वार्मिंग होत नाही आणि हवामान बदल हा एक घोटाळा आहे.FACT

उत्तर गोलार्धातीवरील एकूण बर्फाच्या आच्छादनाची व्याप्ती (SCE) कमी होत चाललेली असल्याचा कल  दर्शवते. नोव्हेंबर 2022 च्या मध्यात SCE मध्ये अल्प-मुदतीची वाढ ही, हवामान बदल नाकारण्याच्या इतिवृत्ताचा एक भाग म्हणून दिशाभूल करून वापरली जात आहे.

ते काय दावा करतात 

1967 मध्ये मोजमाप सुरू झाल्यापासून उत्तर गोलार्धातील बर्फाचे आवरण सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे आणि सध्या ते 56 वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. पण तुम्हाला बातम्यांवर ते ऐकायला मिळणार नाही, ” असा #क्लायमेट्सकॅम” सह ट्विटर पोस्टने उल्लेख केला आहे, त्याचा अर्थ असा आहे की उत्तर गोलार्धातील बर्फाच्या आच्छादनात वाढ झाल्याची अलीकडील रेकॉर्डिंग हे सिद्ध करते की ग्लोबल वार्मिंग होत नाही आणि हवामान बदल हा एक घोटाळा आहे. इतर विविध पोस्ट्समध्ये अनेक त्याच प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. 

आम्हाला काय आढळले

ट्विटर पोस्टमध्ये उद्धृत केलेला आलेख NOAA/रटगर्स ग्लोबल स्नो लॅबमधील आहे ज्यामध्ये नोव्हेंबरच्या मध्यभागी एका विशिष्ट आठवड्यासाठी उत्तर गोलार्धातील (NH) स्नो कव्हर एक्सटेंट (SEC) (बर्फाने व्याप्त भाग) दर्शविला आहे. सदर आलेखानुसार, SEC मधील वाढता कल दीर्घ काळापर्यंत सातत्यपूर्ण नाही. रटगर्स ग्लोबल स्नो लॅबने जारी केलेला नुकताच अद्ययावत आलेख स्पष्टपणे नोव्हेंबरच्या अखेरीस घसरण दर्शवतो.

(स्रोत: WMO चे ग्लोबल क्रायोस्फीअर वॉच पेज)

NH च्या SEC मधील नोव्हेंबरमधील वाढ हा संबंधित बदल का मानला जात नाही?

IPCC च्या परिभाषेनुसार, हवामान बद्दलचा अर्थ “हवामानाच्या अवस्थेतील बदल जो हवामानाच्या  गुणधर्मांची सरासरी आणि/किंवा परिवर्तनशीलता यामधील होणाऱ्या बदलाद्वारे ओळखला (उदा. सांख्यिकीय चाचण्यांचा उपयोग करून) जाऊ शकतो आणि जो विस्तारित कालावधीसाठी, विशेषत: दशके किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहतो.

रटगर्स युनिव्हर्सिटी ग्लोबल स्नो लॅबनुसार, NH ची बर्फाच्छादित व्याप्ती १९६० च्या दशकाच्या मध्यापासून कमी झाली आहे परंतु त्यात वर्षागणिक लक्षणीय परिवर्तनशीलता आहे. उत्तर गोलार्ध (NH) जमिनीवरील वार्षिक बर्फाच्छादित क्षेत्र (SCE) वर्ष 2021 मध्ये सरासरी 24.3 दशलक्ष चौ. किमी आहे जे 1991-2020 च्या सरासरीपेक्षा 0.6 दशलक्ष चौ. किमीने कमी आहे (उत्तर गोलार्ध महाद्वीपीय बर्फ आच्छादन विस्तार: 2021 डेव्हिड ए. रॉबिन्सन यांचेद्वारे). 

दीर्घकाळ कल (स्त्रोत)

नोव्हेंबर 2022 साठी NE चा SEC 37.75 दशलक्ष चौरस किलोमीटर होता, जो 1991-2020 च्या सरासरीपेक्षा 1.04 दशलक्ष चौरस मैलांनी अधिक आहे, तर ऑक्टोबर 2022 मध्ये, SEC 18.66 दशलक्ष चौरस किलोमीटर होता, जो वर्ष 2021 च्या सरासरीपेक्षा 200,0019 चौरस मैलांनी कमी आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2021 साठी उत्तर गोलार्धातील बर्फाने आच्छादित क्षेत्र अनुक्रमे सरासरी 18.14 (2011 नंतरचे सर्वात लहान आच्छादन) आणि 35.45 (2013 पासूनचे सर्वात लहान आच्छादन) दशलक्ष चौरस किमी पेक्षा थोडे जास्त होते. त्यामुळे वर्षानुवर्षे आणि महिना ते महिना, परिवर्तनशीलता अस्तित्त्वात आहे आणि याला हवामानातील परिवर्तनशीलता मानले जाते कारण हवामानाचे मापदंड जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरील घटनेने जोडलेले असतात. हे बदल दीर्घ कालावधीसाठी (दशक किंवा त्यापेक्षा अधिक काळ) टिकून राहिल्यास त्यांचा विचार केला जाऊ शकतो.

नोव्हेंबर 2022 मधील लक्षणीय जागतिक घटना 

वर्ष 1880 पासून पृथ्वीचे तापमान दशकामागे 0.14° F (0.08° C) ने वाढले आहे, परंतु तापमानवाढीचा वेग 1981 पासून दशकामागे 0.32° फॅ (0.18° C) पर्यंत दुपटीने वाढला आहे. नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशन (NCEI) नुसार, या वर्षी, वर्ष 2016 आणि 2018 नंतर पाचव्या सर्वाधिक उबदार सप्टेंबर-नोव्हेंबर कालावधीची नोंद झाली आहे आणि आर्क्टिक आणि अंटार्क्टिकचा समुद्रातील बर्फ रेकॉर्डवरील सर्वात कमी असलेल्या 10 मध्ये आहे.

NOAA ची आकडेवारी आणि रटगर्स ग्लोबल स्नो लॅबच्या विश्लेषणानुसार, उत्तर गोलार्धातील बर्फाने आच्छादलेले क्षेत्र नोव्हेंबरमध्ये 1.04 दशलक्ष चौरस मैल होते जे वर्ष 1991 ते 2020 या दरम्यानच्या कालावधीच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. हे उत्तर गोलार्धासाठी रेकॉर्डवरील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक बर्फाच्छादित क्षेत्र आहे.  SEC हे उत्तर अमेरिका (15.25 दशलक्ष चौरस किलोमीटर), ग्रीनलँड (5.89 दशलक्ष चौरस मैल) आणि युरेशिया (1.38 दशलक्ष चौरस किलोमीटर) वर अधिक लक्षणीय होते.

नोव्हेंबर 2022 जागतिक महत्त्वपूर्ण घटनांचा नकाशा (स्रोत)

ग्लोबल वॉर्मिंगचा NH’s SCE यावर कसा परिणाम होतो??

NH वरील बर्फाचे आच्छादन उबदार होत असलेल्या तापमानामुळे बदलते ज्यामुळे बर्फाची होणारी पर्जन्यवृष्टी आणि कालावधी, उच्च-उंचीचा प्रदेश सोडून, कमी होते आणि हिवाळ्यातील पर्जन्यमानात वाढ झाल्यामुळे बर्फाचे प्रमाण वाढले आहे. सेररेझ et al 2009  यांच्या मते, “बर्फाने आच्छादित क्षेत्रात घट, आणि अशा प्रकारे पृष्ठभागावरील परावर्तन गुणोत्तर, तापमानवाढ सिग्नल वाढवू शकते कारण पृष्ठभागामध्ये जास्त ऊर्जा शोषली जाते. हंगामी बर्फाचे आच्छादन असलेल्या प्रदेशांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत हा सकारात्मक अभिप्राय आहे जो उत्तर गोलार्धावरील वेगाने वाढणाऱ्या तापमानाचे अंशतः स्पष्टीकरण देतो”.

(सुजा मेरी जेम्स यांच्या इनपुटसह)

,
सीएफसी इंडिया
सीएफसी इंडिया
Articles: 74