Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

गेल्या 10,000 वर्षांपैकी 83% वर्षे, पृथ्वी आत्तापेक्षा जास्त उबदार होती असा खोटा दावा पोस्ट करते 

दावा

गेल्या 10,000 वर्षांपैकी 83 टक्के वर्षांच्या कालावधीदरम्यान पृथ्वी आधुनिक युगापेक्षा अधिक उबदार होती . 

वस्तुस्थिती

सध्याचे वार्षिक जागतिक तापमान गेल्या 10,000 वर्षांतील सर्वाधिक उबदार आहे.

ते काय म्हणतात

हवामान नाकारणारे असा दावा करीत आहेत की सध्याच्या कालावधीपेक्षा गेल्या 10,000 वर्षांमध्ये पृथ्वी  जास्त उबदार राहिली आहे आणि सध्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’ नावाचे काहीही घडत नाही, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. हवामान बदलाचे खंडन करण्यासाठी हा दावा अनेकदा वापरला गेला आहे. एक ट्विटर पोस्ट अलीकडेच व्हायरल झाली आहे ज्यात असा दावा केला गेला आहे की आपल्याला वास्तविक ‘थंडीची भीती’ वाटायला हवी, ‘उष्णतेची’ नाही.

हे ट्विट याठिकाणी दिलेले आहे:

आम्हाला काय आढळले

सर्वात अलीकडील वार्षिक जागतिक तापमान डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांनी अलीकडेच असा निष्कर्ष काढला आहे की, पृथ्वी आधीच्या किमान 12,000 वर्षांच्या कालावधीत जेवढी उष्ण होती त्यापेक्षा अधिक उष्ण सध्या आहे. नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेली रटगर्सच्या नेतृत्वाखालील अभ्यासानुसार, सध्याचे वार्षिक जागतिक तापमान हे गेल्या 10,000 वर्षांमधील सर्वाधिक उष्ण तापमान आहे. 

“जागतिक तापमानाच्या पूर्वीच्या पुनर्रचनेच्या विपरीत, आमची पुनर्रचना दर्शविते की पूर्वीच्या हिमनदीच्या कालखंडातील शिल्लक राहिलेल्या बर्फाच्या लाद्यांच्या थंड प्रभावामुळे होलोसीनचा पहिला अर्धा कालावधी हा औद्योगिक कालावधीच्या तुलनेत अधिक थंड होता” असे  पोस्टडॉक्टरल संशोधक असलेल्या प्रमुख लेखिका समंथा बोवा, म्हणाल्या, ज्या सह-लेखक यायर रोसेन्थल यांच्या प्रयोगशाळेतील सहयोगी, रटगर्स विद्यापीठ-न्यू ब्रन्सविक येथील सागरी आणि किनारी विज्ञान विभाग आणि पृथ्वी आणि ग्रह विज्ञान विभागातील एक प्रथितयश प्राध्यापिका आहेत. “हवामान मॉडेलने भाकीत केल्यानुसार, मागील होलोसीन वार्मिंगचे कारण म्हणजे खरोखरच हरितगृह वायूंच्या प्रमाणात झालेली वाढ हे होते, आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कार्बन डायऑक्साइडची  महत्त्वाची भूमिका आहे याविषयी कोणतीही शंका राहत नाही ”.

श्रेय: रटगर्स इन्स्टिट्यूट ऑफ अर्थ, ओशन अँड ऍटमॉस्फेरिक सायन्सेस

अभ्यास सांगतो की, “होलोसीनमधील तापमानाच्या पूर्वी केलेल्या जागतिक पुनर्रचना आणि शेवटचा हिमनगाचा कालावधी हा तापमानाची उत्क्रांती वार्षिकपेक्षा हंगामी प्रतिबिंबित करतो आणि आम्ही ती सरासरी वार्षिक तापमानात रूपांतरित करण्याची पद्धत विकसित करतो… शिवाय, आमची पुनर्रचना सप्रमाण दर्शवते की आधुनिक जागतिक तापमानाने गेल्या 12,000 वर्षांच्या कालावधीतील वार्षिक स्तर ओलांडले आहेत…”

“ही पुनर्रचना असे सूचित करते की हल्लीची तापमाने गेल्या 24,000 वर्षातील अभूतपूर्व तापमाने आहेत आणि पुढे असेही सूचित करते की मानवाद्वारे होत असलेले ग्लोबल वॉर्मिंग हे आपण त्याच काळात जे काही पहिले त्यापेक्षा अधिक वेगाने होत आहे”, असे जेसिका टीएर्ने म्हणाल्या, ज्या अरिझोना गिओसायन्सेसच्या सहयोगी प्राध्यापिका आणि अभ्यासाच्या सह-लेखिका आहेत.

होलोसीन टेम्परेचर कॉनॉन्द्रम

होलोसीन हा पृथ्वीच्या इतिहासाच्या शेवटच्या 11,700 वर्षांचा समावेश असलेला एक युगारंभ आहे. टेम्परेचर कॉनॉन्द्रम म्हणजे होलोसीन दरम्यान तापमानात होणाऱ्या बदलांविषयीचा वादविवाद. यापूर्वी काही संशोधकांद्वारे असे सुचवले गेले होते की होलोसीन कालावधीदरम्यान सरासरी तापमान वर्ष 6,000 ते 10,000 या दरम्यान अत्युच्च होते आणि यानंतर हा ग्रह थंड झाला. शास्त्रज्ञांना आता असे आढळून आले आहे की गेल्या 12,000 वर्षांमध्ये जागतिक तापमान प्रत्यक्षात वाढले आहे आणि हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन आणि हवामान बदल यासारख्या घटकांचे त्यात योगदान आहे.  

सध्याची तापमानवाढ गेल्या 24,000 वर्षांतीलअभूतपूर्व वाढआहे                 

ऍरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमने केलेल्या आणखी एका अभ्यासात असा निष्कर्ष काढला की, गेल्या 24,000 वर्षांतील जागतिक तापमानाची पुनर्रचना दर्शवते की सध्याचे वॉर्मिंग ‘अभूतपूर्व’ आहे. नेचरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासासाठी, टीमने शेवटच्या हिमयुगापासून प्रत्येक 200 वर्षांच्या अंतराचे जागतिक तापमानाचे नकाशे तयार केले.

24,000 वर्षांपूर्वीच्या शेवटच्या हिमयुगापासून जागतिक सरासरी पृष्ठभागाचे तापमान. अलीकडील बदलांची कल्पना येण्यासाठी वेळ गेल्या 1000 वर्षांसाठी विस्तारित केला आहे. श्रेय: मॅथ्यू उस्मान, अभ्यासाचे नेतृत्व करणारे लेखक.

अभ्यास सांगतो की, “मागील प्रॉक्झी-आधारित पुनर्रचनांच्या विपरीत, आमचे परिणाम दर्शवितात की, सुरुवातीच्या होलोसीन (सुमारे 9 हजार वर्षांपूर्वी) पासून, जागतिक सरासरी तापमान ~0.5 °C ने किंचित परंतु स्थिरपणे उबदार झाले आहे. अलीकडील तापमान बदलांशी तुलना केली असता, आमचे पुनर्विश्लेषण दर्शवते की, आधुनिक वॉर्मिंगचा दर आणि तीव्रता हे दोन्ही गेल्या 24 हजार वर्षांतील बदलांच्या तुलनेत असामान्य आहेत.”

“ही पुनर्रचना सूचित करते की सध्याची तापमाने 24,000 वर्षांमधील अभूतपूर्व आहेत, आणि असे देखील सूचित करते की मानव कारणीभूत असलेल्या जागतिक तापमानवाढीचा वेग आपण त्याच काळात पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आहे”, असे यु ऍरिझोना जिओसायन्सेसच्या सहयोगी प्राध्यापिका आणि अभ्यासाच्या सह-लेखिका, जेसिका टियरनी म्हणाल्या.

अधिक अभ्यास याची पुष्टी करतात

2020 च्या अभ्यासानुसार, होलोसीनचा 200 वर्षांचा सर्वाधिक उष्ण कालावधी हा औद्योगिकीकरणाआधी सुमारे 6500 वर्षांपूर्वी झाला होता जेव्हा जागतिक पृष्ठभागाचे तापमान 19 व्या शतकाच्या तुलनेत सुमारे 0.7 अंश सेल्सिअस जास्त होते. तथापि, नंतर 2011 ते 2019 या कालावधीत, तापमान 19 व्या शतकाच्या तुलनेत सरासरी 1 अंश सेल्सिअसने जास्त होते. अंतिमतः  हे अलीकडील तापमान संपूर्ण होलोसीनपेक्षा अधिक आहे.

2013 च्या आणखी एका अभ्यासाने जागतिक पृष्ठभागाच्या सरासरी तापमानाची पुनर्रचना केली आणि असा निष्कर्ष काढला की सध्याची तापमाने “संपूर्ण होलोसिनच्या 90 टक्के कालावधीतील तापमानापेक्षा जास्त आहे.”

प्रोफेसर कॉफमॅन यांच्या  2022 च्या तांत्रिक टिपणीचानिष्कर्ष असा आहे की, “मानव कारणीभूत असलेली जागतिक तापमानवाढ आता होलोसीनच्य सर्वाधिक उष्ण बहु-शताब्दी कालावधीपेक्षा अधिक आहे आणि त्यात्या आवरणाखाली खाली कृषी आधारित समाजाची भरभराट झाली आहे”.

IPCC चा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या वातावरण बदलावरील मूल्यांकन अहवालानुसार, ‘पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जागतिक तापमानात, 1850 पासून ते 1900 पर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 1.1 डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे आणि ही अशी पातळी साधारण 125,000 वर्षांपूर्वी हिमयुगाच्या आधीपासून कधीही पाहण्यात आली नाही.

“सर्वात अलीकडील दशकातील तापमान (2011-2020) सुमारे 6500 वर्षांपूर्वी सर्वात अलीकडील बहु-शताब्दी उष्ण कालावधीतील,  [0.2°C ते 1°C सापेक्ष 1850-1900], तापमानापेक्षा जास्त आहे. त्याआधी, नंतरचा सर्वात अलीकडील उष्ण कालावधी सुमारे 125,000 वर्षांपूर्वी होता, जेव्हा बहु-शतक तापमान [0.5°C ते 1.5°C सापेक्ष 1850-1900] सर्वात अलीकडील दशकातील निरीक्षणांना मागे टाकते” असे आयपीसीसीच्या अहवालात म्हटले आहे.

,
Anuraag Baruah
Anuraag Baruah
Articles: 11