Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

वर्णन केले | पर्यावरणीय स्थिरता, हवामानातील लवचिकता आणि मानवी आरोग्यासाठी पाणथळ जागा इतक्या महत्त्वाच्या का आहेत

डॉ. पार्थ ज्योती दास यांचे द्वारे

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जैवविविधतेसाठी पाणथळ जागेची महत्त्वाची भूमिकाआणि ते प्रदान करीत असलेल्या हवामान बदल आणि शाश्वत विकासावरील उपाय यांची कबुली देण्याची वेळ आली आहे. जगातील पाणथळ जागांचे होणारे नुकसान थांबविण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याची हीच वेळ आहे” – सरचिटणीस, मार्था रोजास उरेगो, रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड  

पाणथळ जागा म्हणजे काय?

शास्त्रज्ञांनी पाणथळ जागांची परिभाषा विविध मार्गांनी आणि शब्दांनी केली आहे. सर्व वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांचा विचार करून, पाणथळ जमिनीचे वर्णन, पाण्यात बुडलेली किंवा पाण्याने संपृक्त केलेली जमीन, ज्यात जमीन-जल इंटरफेस आणि त्याची स्वतःची एक वेगळी परिसंस्था असणे आवश्यक आहे, अशी केली जाऊ शकते. ती नैसर्गिक किंवा मानवाने तयार केलेली, अंतर्देशीय किंवा किनारपट्टी, कायम किंवा तात्पुरती, स्थिर किंवा प्रवाही, वनस्पतिजन्य किंवा बिगर वनस्पतिजन्य असू शकतात.

जागतिक स्तरावर, पाणथळ जमिनींचे वर्गीकरण तीन वर्गांमध्ये केले जाऊ शकते: अंतर्देशीय पाणथळ प्रदेश (जलमय प्रदेश, दलदलीचा प्रदेश, तलाव, नद्या, भूमिगत जलचर, पूर मैदाने, पीटलँड आणि ओला गवताळ प्रदेश); किनाऱ्यावरील पाणथळ प्रदेश (खारट पाण्याची दलदल, नदीचे खोरे, डेल्टा आणि भरती-ओहोटी, खारफुटी, सरोवरे आणि कोरल रीफ) आणि मानवनिर्मित पाणथळ जमीन (घरगुती तलाव, टाक्या, मासे/शेती तलाव, तांदूळ किंवा भातशेती आणि मिठागर). भारतीय संदर्भात, पाणस्थळाचे प्रकार जे सर्वदूर दिसून येतात, ज्यात मैदाने, टेकड्या आणि पर्वता यांचा समावेश आहे, आणि जलमय प्रदेश, दलदलीचा प्रदेश, खड्डा, तलाव, टाकी इत्यादी विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या जलस्रोतांना पाणथळ प्रदेश मानले जाते.

पाणथळे ही नैसर्गिक जलविज्ञान, भूरूपशास्त्रीय आणि भूवैज्ञानिक घटक आणि प्रक्रिया यांच्या अंतर्क्रियेमुळेतयार होतात. ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पर्यावरणाचे तसेच जीवावराबाचे महत्त्वाचे घटक आहेत कारण ते अपवादात्मक उच्च जैविक विविधतेला आधार देतात, ज्यामुळे त्यांना ग्रहावरील सर्वात मौल्यवान परिसंस्थांमध्ये स्थान देण्यात आले आहे. जलविज्ञान चक्रात पाणथळ भूभाग महत्त्वाची भूमिका बजावतात आणि जलविज्ञान जोडणीद्वारे संबंधित नद्या आणि पूर मैदानांसोबत पाणी आणि गाळाची देवाणघेवाण सुलभ करतात.

मानवाकरिता पाणथळ जागा का महत्वाच्या आहेत?

पाणथळ जागा मानवी कल्याणासाठी अनेक प्रकारे योगदान देतात. उदाहरणार्थ, पाणथळ क्षेत्र विविध प्रकारच्या पर्यावरणीय सेवा प्रदान करतात जे विविध प्रकारच्या वनस्पती, जीवजंतूंच्या अस्तित्वासाठी आणि मानवांच्या अस्तित्वासाठी आणि उदरनिर्वाहासाठी महत्त्वपूर्ण आहेत. सर्व वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींपैकी सुमारे 40 टक्के प्रजातींचा या पाणथळ प्रदेशात अधिवास आहे किंवा तिथे प्रजनन करतात. पाणथळ जागेमध्ये जंगलांपेक्षा अधिक जैवविविधता आहे, आणि ग्रहाच्या 40% प्रजाती केवळ 7% जमिनीवर आहेत. जगातील 140,000 पेक्षा जास्त प्रजाती ज्यात सर्व माशांपैकी 55% – त्यांच्या अस्तित्वासाठी पाणथळ जमिनीवर आणि संबंधित गोड्या पाण्यातील अधिवासांवर अवलंबून असतात. जागतिक स्तरावर धोक्यात आलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी 12 टक्के प्रजाती पाणथळ जमिनीवर अधिवासासाठी अवलंबून आहेत.

पाणथळ प्रदेश पूर आणि दुष्काळ यांसारख्या अत्यंत हवामानाच्या घटनांची तीव्रता कमी करतात, शुद्ध पाणीपुरवठा सुलभ करतात, भूजल पुनर्भरणात मदत करतात आणि त्यांच्या आसपासच्या भागातील सूक्ष्म-हवामान नियंत्रित करतात. पाणथळ जागा जागतिक स्तरावर कार्बन सिंक आणि हवामान स्थिर करणारे म्हणूनही काम करतात आणि अशा प्रकारे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल कमी करण्यात मदत करतात. विशेषत: हवामान बदल शमविण्यात आणि अनुकूलन यासाठी निसर्ग-आधारित उपायांमध्ये पाणथळ प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतात.

पाणथळ प्रदेश हे पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या सात टक्के क्षेत्र व्यापतात, आणि ते एकूण नैसर्गिक उत्पादकता आणि ग्रहावरील सर्व नैसर्गिक परिसंस्थांच्या पर्यावरणीय सेवांच्या 45 टक्के उत्पन्न देतात. जागतिक स्तरावर, पाणथळ परिसंस्थेचे हवाई व्याप्ती 1.5 ते 1.6 अब्ज हेक्टर पर्यंत आहे ज्याचे अंदाजे आर्थिक मूल्य मानवजातीला वर्षाला सुमारे US$20 ट्रिलियन इतके आहे.

भारतातील पाणथळ प्रदेशांची स्थिती काय आहे?

भारताच्या भूभागात वैविध्यपूर्ण आणि अद्वितीय पाणथळ अधिवास आहेत, त्यांना आधार दिला जातो आणि ते टिकून रहातात. देशाला लाभलेले 1150 मि.मी.पेक्षा जास्त सरासरी वार्षिक पर्जन्यमान, विविध स्थलाकृतिक आणि योग्य हवामान प्रदेश, यामुळे देश हा असंख्य आर्द्र प्रदेशांचे समृद्ध भांडार बनला आहे. देशात आढळणारी नैसर्गिक पाणथळ जमीन ही सामान्यत: अधिक उन्हावर असलेले हिमालयीन तलाव, प्रमुख नदी प्रणालींच्या पूरपट्ट्यातील पाणथळ प्रदेश, रखरखीत आणि अर्ध-शुष्क प्रदेशातील खारट आणि तात्पुरती पाणथळ जमीन, किनारपट्टीका पाणथळ प्रदेश जसे की, खारफुटी, बॅकवॉटर, मुहाने, खारफुटीची दलदल,  प्रवाळ, खडक, सागरी आर्द्र प्रदेश इथपर्यंत, आढळते.

सर्वात अलीकडच्या एस्टिमेशननुसार, जे 2017-१८ मध्ये स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद, भारत सरकार, यांनी केले, भारतात एकूण पाणथळ भूभाग जवळपास 15.98 दशलक्ष हेक्टर्स (mha) आहे जो देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अंदाजे 4.86% इतका आहे. या अभ्यासात एकूण 2,31,195 पाणथळ जागा (जे 2.25 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे) नकाशात करण्यात आली. क्षेत्र व्याप्तीच्या दृष्टीने प्रमुख पाणथळ प्रकार म्हणजे नदी आणि प्रवाह, जलाशय, आंतरभरतीचा गाळ आणि टाकी/तलाव. एकूण पाणथळ क्षेत्रापैकी एक तृतीयांश (35.2%) पेक्षा जास्त भाग नद्यांनी व्यापलेला आहे आणि सुमारे 43% पाणथळ क्षेत्र एकत्रितपणे जलाशयांनी (17.1%), आंतर-भरतीचा गाळ (14.4%) आणि टाकी/तलाव (11.4%) यांनी व्यापलेले आहे. मानवनिर्मित पाणथळ क्षेत्रांपैकी, देशातील जलाशयांची संख्या 12,802 (एकूण पाणथळ क्षेत्राच्या 5.5%) 11.81 mha क्षेत्र व्यापते, तर टाकी/तलाव 1,51,815 (एकूण पाणथळ क्षेत्राच्या 65.7%) 1.81 mha क्षेत्र व्यापतात.  भारतामध्ये 75 ‘आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागा’ आहेत (ज्याला रामसर साइट्स देखील म्हणतात, जे या लेखात नंतर स्पष्ट केला आहे त्यानुसार). 

अभ्यासानुसार, सन 2006-07 मध्ये केलेल्या सर्वेक्षणादरम्यान मिळालेल्या आकडेवारीच्या तुलनेत 18810 पर्यंत पाणथळ जमिनीच्या संख्येत वाढ झाली आहे, तसेच पाणथळ क्षेत्रामध्ये 0.64 mha ने वाढ झाली आहे. तथापि, यातील बहुतेक वाढ ही अंतर्देशीय मानवनिर्मित आणि किनारपट्टीवरील मानवनिर्मित पाणथळ जमिनीच्या बाबतीत दिसून आली आहे. तथापि, इतर विविध स्त्रोतांनी आणि माध्यम अहवालांनी, जिथे नैसर्गिक पाणथळ प्रदेशांचा संबंध  आहे, तिथे खेदजनक स्थिती दर्शविली आहे.

पाणथळ जागांना कोणते धोके आहेत?

पाणथळ जागा या पृथ्वीवरील सर्वाधिक धोका असलेल्या आणि हानी होणाऱ्या नैसर्गिक परिसंस्था आहेत. संपूर्ण जगात पाणथळ जागा, अतिक्रमण, जमीन भरणे आणि इतर जमिनीच्या वापरामध्ये रूपांतर करणे (जसे की, शेती, सेटलमेंट आणि व्यवसाय क्षेत्र), जलद शहरीकरण, प्रदूषण (उदा. घनकचरा, औद्योगिक सांडपाणी), जलविभागणीसह जलविज्ञान(प्रवाह) बदल, जलसंपत्तीचे अतिशोषण (उदा., अतिमासेमारी), बेड आणि काठावर जास्त गाळ आणि परिणामी पाणी वहन क्षमतेत घट, युट्रोफिकेशन, आक्रमक प्रजाती, ऱ्हास आणि जवळच्या वाहिन्यांशी संपर्क तुटणे, भू-आकृतिशास्त्रीय बदल आणि अपस्ट्रीम नद्यांवर संरचनात्मक हस्तक्षेप आणि हवामान बदल इ. कारणांमुळे मोठयाप्रमाणात ऱ्हासाला सामोऱ्या जात आहेत

जागतिक स्तरावर, पाणथळ जागा या जंगलांपेक्षा तिप्पट वेगाने नष्ट होत आहेत आणि त्यांचे नाहीसे होण्याचा दर वाढत आहे. 1700 च्या शतकापासून सुमारे 90% पाणथळ जागांचा ऱ्हास झाला किंवा त्या  गमावल्या गेल्या आहेत आणि 35% पाणथळ जागा 1970 च्या दशकापासून गायब झाल्या आहेत, जो इतर प्रमुख परिसंस्थांच्या तुलनेत सर्वात वेगवान दर आहे.

भारतात, अनेक पर्यावरणीय, सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या पाणथळ जमिनी, विशेषत: लहान, या वसाहती, शेती, शहरीकरण आणि इतर विकास क्रियामधील वाढत्या दबावाला बळी पडून नाहीशा झाल्या आहेत किंवा त्यांचा ऱ्हास झाला आहे. तथापि, अशा वारंवार गमावल्या जाणाऱ्या पाणथळ जमिनींचे किंवा पाणथळ जमिनीच्या ऱ्हासाच्या स्थितीची योग्य गणना होत नाही.

हवामा बदल आणि पाणथळ जागा

हवामानातील बदल विविध मार्गांनी पाणथळ जमिनीवर परिणाम करतात, तर पाणथळ जमीन हवामानातील बदल शमविण्याचे आणि अनुकूलतेचे साधन प्रदान करते. वाढणारे हवामानाचे तापमान, अतिउष्णता, आग आणि दुष्काळ, यामुळे पाणथळ परिसंस्थेला हानी पोहोचवतात आणि त्यांचा ऱ्हास होतो. पाणथळ जागांचा ऱ्हास आणि गमावणे यामुळे, मोठ्या प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन होऊन ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदल यांची तीव्रता वाढू शकते . ऱ्हास झालेली पाणथळ जमीन निरोगी पाणथळ जमिनीपेक्षा जास्त मिथेन उत्सर्जित करू शकते.

निसर्गातील पाणथळ जमिनी या सर्वात प्रभावी कार्बन सिंक आहेत ही वस्तुस्थिती त्यांना वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सक्षम करते आणि त्याद्वारे जागतिक तापमानवाढ मर्यादित करण्यात मदत होते. उदाहरणार्थ, ग्रहाचा फक्त तीन टक्के भाग व्यापणारी खड्ड्यांची जागा, जमिन-आधारित संपूर्ण कार्बनच्या जवळजवळ एक तृतीयांश कार्बनचा संचय करतात, जे जगातील सर्व जंगलांपेक्षा दुप्पट आहे. खारट दलदल, खारफुटी आणि सीग्रास बेड यांसारख्या किनारपट्टीच्या पाणथळ प्रदेशांमध्ये देखील कार्बन-sikvestaring  गुणधर्म आहेत. अशाप्रकारे पाणथळ जमिनी हवामान बदल कमी करण्यास मदत करतात.प्रवाळ खडक आणि खारफुटी, पाणथळ प्रदेश पावसाचे पाणी शोषू शकतात, ज्यामुळे पूर कमी होऊ शकतात, जंगलातील आग शांत करू शकतात आणि दुष्काळाचा प्रभाव सुरू होण्यास विलंब करू शकतात. अशा प्रकारे, पाणथळ जागा आपत्ती जोखीम कमी करण्यास, हवामानातील अनुकूलता आणि जवळच्या समुदायांची लवचिकता निर्माण करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे, पाणथळ प्रदेशांचे संरक्षण, पुनर्संचयित करणे आणि शाश्वत व्यवस्थापन हे हवामान बदल शमविण्याचे आणि अनुकूलतेचे एक कार्यक्षम साधन आहे, ज्यामुळे पाणथळ प्रदेश हवामान बदलासाठी काही सर्वोत्तम निसर्ग-आधारित उपाय प्रदान करण्यासाठी ओळखले जातात.

सीएफसी इंडिया
सीएफसी इंडिया
Articles: 74