Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
दावा
यूएन दावा करीत आहे की CO2 कर्करोगापेक्षा प्राणघातक आहे.
वस्तुस्थिती
यूएन म्हणत नाही की CO2 कर्करोगापेक्षा प्राणघातक आहे, त्याऐवजी, असे म्हणत आहे की कार्बन उत्सर्जन जास्त राहिल्यास, आरोग्यावर हवामान बदलाचा प्रभाव जगाच्या काही भागांमध्ये, कर्करोगापेक्षा दुप्पट प्राणघातक असू शकतो.
ते काय दावा करतात
10 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या एका ट्विटर पोस्टमध्ये ‘#ClimateScam’ हॅशटॅग वापरला गेला आणि युट्यूब व्हिडिओ शेअर केला आणि दावा केला की UN ने म्हटले आहे की CO2 कर्करोगापेक्षा प्राणघातक आहे जो ‘UN कडून’ जंक सायन्सच्या अनेक स्तरांवर आधारित असंस्कृत उन्मादपूर्ण दावा आहे.
आम्हाला काय सापडले
ट्विटर पोस्ट यूएनच्या अहवालात सादर केलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावत आहे. हवामान बदलाच्या संदर्भात कर्करोगाविषयी सांगणारा यूएन अहवाल प्रत्यक्षात म्हणतो, “UN डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅब यांनी शुक्रवारी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, कार्बन उत्सर्जन जास्त राहिल्यास आरोग्यावर हवामान बदलाचा प्रभाव, जगाच्या काही भागांमध्ये कर्करोगापेक्षा दुप्पट प्राणघातक असू शकतो.
अहवालात अशी स्थिती नमूद करण्यात आली आहे की, कार्बन डाय ऑक्साईड कर्करोगापेक्षाही प्राणघातक असू शकतो या दाव्याच्या विपरीत, जेव्हा कार्बन उत्सर्जन जास्त राहते तेव्हा ते जगाच्या काही भागांमध्ये प्राणघातक ठरू शकते.
ट्विटर पोस्टमध्ये कार्बन डाय ऑक्साईडचे महत्त्व स्पष्ट करणारा व्हिडिओ देखील समाविष्ट आहे आणि त्यात काही असंबद्ध डेटा दर्शविला आहे जो UN ने सादर केलेल्या अहवालाच्या संदर्भात बसत नाही.
संयुक्त राष्ट्रांचा अहवाल काय म्हणतो?
बांगलादेशातील ढाकाचे उदाहरण घेतल्यास, अभ्यासाचा अंदाज आहे की हवामान बदलामुळे होणारे अतिरिक्त मृत्यू हे बांगलादेशच्या सध्याच्या सर्व प्रकारच्या कर्करोगांमुळे होणार्या वार्षिक मृत्यू दराच्या दुप्पट आणि रस्त्यांवरील वाहतुकीच्या मृत्यूच्या वार्षिक मृत्यूच्या 10 पट वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या तपशिलावरून असेही दिसून आले आहे की हवामान बदलामुळे पाकिस्तानमधील मृत्यू दर हा 100,000 लोकसंख्येमागे सुमारे 67 याप्रमाणे वाढेल आणि स्ट्रोकपेक्षा जास्त मृत्यू होतील जे देशाचे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे.
हवामान बदलामुळे तापमानात वाढ झाल्या चा ऊर्जेवर, कामगार उत्पादकता आणि मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अहवालात अल्प-मुदतीच्या वाढीव हवामान प्रतिज्ञा आणि दीर्घकालीन धोरणांचे, ज्यामध्ये देश हरितगृह वायू उत्सर्जन निव्वळ शून्यापर्यंत कमी करण्याच्या त्यांच्या योजना मांडतील, विश्लेषण केले आहे.
हवामान बदलासाठी जबाबदार असलेले वायू
USEPA कडील डेटा दर्शवितो की जागतिक हरितगृह उत्सर्जनात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण 78% आहे आणि त्यानंतर मिथेन चे प्रमाण आहे.
जीवाश्म इंधन जाळणे हा CO2 चा प्राथमिक स्त्रोत आहे. मानवी क्रीयांमुळे जमीन संसाधनांचा होत असलेला वापर आणि जंगलतोड हे देखील CO2 चे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. वनजमिनीच्या वापरावर थेट मानव-प्रेरित प्रभावातूनही CO2 उत्सर्जित होऊ शकतो, जसे की शेतीसाठी जमीन साफ करणे आणि मातीची होणारी अवनती. कृषी उपक्रम, कचरा व्यवस्थापन, ऊर्जेचा वापर आणि बायोमास जाळणे हे एकत्रितपणे मिथेन वायू उत्सर्जनात योगदान देतात.
खतांचा वापर हा N2O उत्सर्जनाचा प्राथमिक स्रोत आहे. बायोमास जाळल्याने देखील N2O निर्माण होते. औद्योगिक प्रक्रिया, रेफ्रिजरेटर्स आणि पेंटिंग उत्पादनांचा वापर हायड्रोफ्लोरोकार्बन्स (HFCs), परफ्लुरोकार्बन्स (PFCs) आणि सल्फर हेक्साफ्लोराइड (SF6) सारख्या फ्लोरिनेटेड वायूंच्या उत्सर्जनात योगदान देतात.
ग्लोबल वार्मिंग संभाव्यता समजून घेणे
हरितगृह वायू (GHGs) जसे मिथेन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लुरोकार्बन ऊर्जा शोषून आणि किरणोत्सर्ग पृथ्वीवरून अवकाशात निघून जाण्याचा वेग कमी करून, पृथ्वीला उबदार करतात. वेगवेगळ्या हरितगृह वायूंचा पृथ्वीच्या तापमानवाढीवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. ज्या मार्गांनी हे वायू एकमेकांपासून भिन्न होतात ते दोन प्रमुख मार्ग म्हणजे त्यांची ऊर्जा शोषण्याची क्षमता (त्यांची “रेडिएटिव्ह कार्यक्षमता” म्हणूनही ओळखली जाते), आणि त्यांचा वातावरणात राहण्याचा कालावधी किंवा ते किती काळ वातावरणात राहतात (म्हणजे त्यांचा “जीवनकाळ”).
युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंटल पोटेंशियल एजन्सीनुसार, “ग्लोबल वॉर्मिंग पोटेंशियल (GWP), विविध वायूंच्या ग्लोबल वॉर्मिंग प्रभावांची तुलना करण्यास परवानगी देण्यासाठी विकसित केले गेले. विशेषत:, 1 टन कार्बन डायऑक्साइड (CO2) च्या उत्सर्जनाच्या तुलनेत 1 टन अन्य वायूचे उत्सर्जन दिलेल्या कालावधीत किती ऊर्जा शोषून घेईल, याचे हे मोजमाप आहे. GWP जितका मोठा असेल तितका त्या कालावधीत CO2 च्या तुलनेत दिलेला वायू पृथ्वीला उष्ण करतो.
सामान्यतः GWPs साठी वापरला जाणारा कालावधी 100 वर्षे असतो. GWPs मोजण्याचे एक सामान्य एकक प्रदान करतात, जे विश्लेषकांना वेगवेगळ्या व्हायच्या उत्सर्जनाचा अंदाज जोडण्याची अनुमती देतात (उदा. राष्ट्रीय GHG इन्व्हेंटरी संकलित करण्यासाठी), आणि धोरणकर्त्यांना विविध क्षेत्रांमध्ये आणि वायूंमध्ये उत्सर्जन कमी करण्याच्या संधींची तुलना करण्यास अनुमती देते.
प्रमुख हरितगृह वायूंची ग्लोबल वार्मिंग संभाव्यता
स्रोत हा तक्ता ही वास्तूस्थुती ठळकपणे स्पष्ट करतो की, कार्बन डाय ऑक्साईड व्यतिरिक्त इतरही अनेक वायू आहेत जे कमी प्रमाणात असले तरी त्यांची ग्लोबल वार्मिंगची संभाव्यता कार्बन डाय ऑक्साईडपेक्षा हजारो पटीने अधिक आहे. हे वायू हवामान बदलालाही हातभार लावतात. त्यामुळे, हवामानातील बदल म्हणजे केवळ कार्बन डाय ऑक्साईडचा विषय नाही, तर इतर ही वायू आहेत ज्यांचे उत्सर्जन तपासणे आवश्यक आहे. UN बातम्या जगाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन हवामान बदल कमी करण्याच्या योजना बनवण्याचे आवाहन करते. अशा प्रकारे कार्बन उत्सर्जन कमी करून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखले जाऊ शकतात.