Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
सीएफसी इंडिया / मार्च 21, 2023 / वैशिष्ट्य, पाण्याचे व्यवस्थापन
सुजाता मेरी जेम्सद्वारे
मार्च 2, 2023 रोजी, केरळमधील कोची स्थित ब्रह्मपुरम कचरा प्रक्रिया सुविधा याठिकाणी 60 एकर कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, आणि राज्याच्या अग्निशमन यंत्रणेसमोर एक महत्त्वपूर्ण आव्हान उभे राहिले. आग शेवटी मार्च 13, 2023 ला संध्याकाळी आटोक्यात आली. जरी असे असले तरी, धोकादायक धुके अजूनही शहराला वेढून आहे, ज्यामुळे दैनंदिन जगणे विश्वास बसणार नाही इतके अस्वस्थ झाले आहे.
कोची नगरपालिकेला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे प्रधान खंडपीठाद्वारे, त्यांच्या जबाबदाऱ्यांकडे सतत दुर्लक्ष केल्याने लक्षणीय आगीनंतर ब्रह्मपुरम येथील कचरा डंप साइटवर संकट ओढवले, यासाठी पर्यावरण नुकसान भरपाई म्हणून 100 करोड रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनेक वर्षांपासून, ब्रह्मपुरम लँडफिल, विघटनशील आणि विघटन न करता येणार्या कचऱ्याने भरलेले असून पर्यावरणीय प्रदूषण, आगीचा धोका आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षाविषयक चिंतेचे महत्त्वपूर्ण स्रोत बनले आहे. गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ केरळ उगमस्थानी कचरा विलगीकरणाला प्रोत्साहन देत असून देखील, कोची महानगरपालिका (KMC) आणि शेजारच्या स्थानिक सरकारांनी ब्रह्मपुरमची केंद्रीकृत सुविधा म्हणून स्थापना केली जेणेकरून त्याठिकाणी ते परिणामांची चिंता न करता विलग न केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतील. आता या परिस्थितीने केरळमधील शहरांनी त्यांचा वाढत कचरा हाताळण्यासाठी वापरलेल्या कालबाह्य पद्धतींवर प्रकाशझोत टाकला आहे
केरळ उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने ठरविले आहे की ब्रह्मपुरम कचरा प्रक्रिया सुविधा 2016 च्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करीत नाही. नियमाप्रमाणे “कचऱ्याचे विलगीकरण स्त्रोताच्या ठिकाणापासूनच करायला हवे आणि त्याचे विघटनकारी घटकांवर स्त्रोताच्या ठिकाणीच प्रक्रिया करून त्याला खतामध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे”.
छायाचित्र : मनोरमा
तसेच पॅनेलने असे देखील नमूद केले आहे की विंडो प्लांटला सामावून घेण्याची साइटची क्षमता यासारख्या अनेक बदलत्या घटकांचा विचार केल्यास, ब्रह्मपुरमला पाठवल्या जाणाऱ्या विघटनशील कचऱ्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. इमारतीचा एक महत्त्वाचा तुकडा आधीच कोसळला आहे आणि तो त्या ठिकाणाहून काढला गेला आहे, तर उर्वरित संरचना कमकुवत झाली आहे आणि कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे.
इतिहास
कोची महामंडळाने ब्रम्हपूरम येथे कचरा प्रक्रिया सुविधा बांधकामासाठी 1998 मध्ये 37 एकर मालमत्ता खरेदी केली होती. आंध्र प्रदेश तंत्रज्ञान विकास महामंडळासोबत 2005 मध्ये एक करार करण्यात आला होता. त्यानंतर 2008 मध्ये 15 एकर दलदल साफ करून एक सुविधा स्थापन करण्यात आली होती. 2008 मध्ये तेथे दररोज 250 मेट्रिक टन कचरा उचलण्याची क्षमता असलेला ट्रीटमेंट प्लांट स्थापन करण्यात आला.
सद्यस्थिती
सध्या ब्रम्हपुराम कचरा कारखान्याने कोचीच्या मुख्य आयटी पार्कच्या जवळ 110 एकर जमीन व्यापली आहे. दररोज ब्रह्मपुरम कचरा प्रकल्पात 390 टन कचरा विल्हेवाटीसाठी प्राप्त होतो. कोची महामंडळाव्यतिरिक्त, चेरनाल्लूर, वडावुकोड पुथनकुरीश, कलामास्सेरी, अलुवा, अंगमाली, थ्रिकाकारा आणि थ्रीपुनिथारा या नगरपालिका ब्रम्हपुराम कचरा कारखान्यामध्ये कचरा डम्प करतात. 64% जैवविघटन करण्यायोग्य असून उर्वरित 34% मध्ये प्लॅस्टिक आणि इतर अविघटनशील कचरा समाविष्ट आहे. मार्च 2023 पर्यंत 40 एकरांमध्ये पसरलेला एकूण 5.5 लाख टन कचरा साइटवर उपस्थित असल्याचे समजते.
तज्ज्ञ काय म्हणतात
युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामच्या क्रायसिस मॅनेजमेंट शाखेचे ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. मुरली थुम्मारुकुडी यांनी सीएफसीला सांगितले, “जरी आगीच्या घटनेवर आणि विशेषतः डायऑक्सिनवर लक्ष केंद्रित करणे हे अतिशय नैसर्गिक आणि आकर्षक असले तरी, मला वाटते जो महत्वाचा प्रश्न विचारला गेला पाहिजे तो म्हणजे 1 दशलक्षाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन याबाबत असला पाहिजे. शहराने ही संधी त्यांच्या सगळ्या कचरा प्रवाहासाठी आधुनिक कचरा व्यवस्थापन केंद्र अमलात आणण्यासाठी केली पाहिजे आणि त्यांच्या लोकांना कचरा कमी करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे याविषयी शिक्षित केले पाहिजे. वारसा कचरा व्यवस्थापनासाठी कालबद्ध प्रकल्प राबवला जायला हवा.”
थनलचे संचालक श्रीधर राधाकृष्णन त्यांनी थाऊ न्यूजला ब्रह्मपुरमच्या घटने विषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ब्रम्हपूरम साईट हि कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श जागा नाही, आणि 2023 मधील आगीची घटना ही एक वेगळी घटना नाही कारण या ठिकाणी 2018 पासून प्रत्येक उन्हाळ्यात आगीच्या घटना घडत आहेत. कारण त्याठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या योग्य पद्धती नाहीत, आणि सर्व प्रकारचा कचरा एकत्रच साठवला जातो. उन्हाळतामध्ये हा भाग जैवविघटनशील कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेनमुळे अतिशय कोरडा होतो आणि त्यामुळे आगीच्या घटननसाठी हा भाग अधिक संवेदनशील/धोकादायक होतो. हि जागा कचहऱ्याच्या ट्रीटमेंटसाठी सोयीस्कर का नाही याची तीन करणे त्यांनी दिली आहेत. पहिले म्हणजे ब्रम्हपुराण हि आधी दलदलीची जागा होती, आणि तिचा वापर व्यावसायिक हेतूसाठी करण्याचा अयोग्य सल्ला दिला गेला. दुसरे म्हणजे, कादंबरयार आणि चित्रपुझा या दोन नद्या- सहा पंचायतींसाठी पाण्याचे स्त्रोत या प्रदेशाजवळून वाहतात. आणि सेंद्रिय कचऱ्याच्या गळतीमुळे या नद्या प्रदूषित होत आहेत.
अ-जैवविघटनशील कचऱ्याच्या उपचारासाठी विंडो कंपोस्टिंग सुविधेमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, म्हणजे; ते सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करू शकतात परंतु त्यात मिसळू शकत नाहीत. या ठिकाणी वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनाचा कोणताही पुरावा नव्हता. बायोमायनिंगच्या प्रमुख उत्पादनांपैकी एक, रिफ्यूज-डीराईवड फ्युएल (RDF) हे निकृष्ट दर्जाचे आहे कारण सुविधा असलेल्या ठिकाणी सामग्रीनुसार विलगीकरण केलेले नाही.
कचरा साठवण यार्डमध्ये आगीचा उद्रेक झाल्याने शहरातील आणि उपनगरातील लोकांना विषारी डीएक्झिनच्या उच्च पातळीच्या संपर्कात आणले. सीएसआयआर-एनआयआयएसटीच्या पर्यावरण तंत्रज्ञान विभागाने तिरुवनंतपुरममध्ये फेब्रुवारी 2019 आणि 2020 मध्ये आगीच्या दोन महत्त्वाच्या घटनांवर केलेल्या संशोधनानुसार, सामान्य हवेमध्ये डायऑक्सिनची सरासरी पातळी संदर्भ आणि फील्ड रिक्त डेटापेक्षा 50 पट जास्त होती.
“जेंव्हा डायॉक्सिनची पातळी अल्पावधीत वाढत असते तेंव्हा त्याची तीव्रता आणि कालावधी दीर्घकालीन आरोग्यास हानी पोहोचवण्याइतकी पातळी (सामान्यत:) नसते. एखाद्या घटनेनंतरचे आरोग्य अभ्यास हे एखाद्या घटनेमुळे किंवा प्रदूषकामुळे आरोग्यावर होणार्या कोणत्याही प्रकट परिणामांचे श्रेय देण्यासाठी खूप गुंतागुंतीचे असतात,” डॉ. मुरली थुम्मारुकुडी पुढे म्हणाले.
डायऑक्सिन म्हणजे काय?
“डायॉक्सिन्स हे पर्सिस्टंट ऑर्गेनिक प्रदूषक (POPs) म्हणून ओळखल्या जाणार्या धोकादायक रसायनांचा समूह असलेल्या तथाकथित “डर्टी डझन” मधील आहे – – WHO (2016). अशी अनेक शेकडो अपायकारक संयुगे आहेत, तीन संबंधित वर्गात आहेत; पॉलीक्लोरिनेटेड डायबेंझो-पी-डायॉक्सिन्स (पीसीडीडी), पॉलीक्लोरिनेटेड डायबेंझोफ्युरान्स (पीसीडीएफ), पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स (पीसीबी). जरी शेकडो PCDDs, PCDFs आणि PCBs अस्तित्वात असले तरी त्यापैकी फक्त काही – विशिष्ट स्थितीत क्लोरीन अणू असलेले – विषारी आहेत. हे घटक अत्यंत विषारी पर्यावरणीय प्रदूषक मानले जातात कारण ते अन्न साखळीत वारंवार तयार होतात. असा अंदाज आहे की शरीरातील डायऑक्सिनचे अर्धे आयुष्य 7 ते 11 वर्षे आहे. ही संयुगे चरबीमध्ये विरघळणारी असल्याने, बायोमॅग्नेफिकेशनमुळे, “प्राणी अन्नसाखळीत जितके जास्त असेल तितके डायऑक्सिनचे प्रमाण जास्त असेल.”
डीऑक्सिन्स (PCDDs आणि PCDFs) हे मुख्यत्वेकरून वितळणे, पेपर पल्पचे क्लोरीन ब्लीचिंग आणि काही तणनाशके आणि कीटकनाशके तयार करणे भाषांसह आद्योगिक प्रक्रियांमधून तयार होणारे बाय प्रोडक्ट आहेत. ते काही नैसर्गिक घटना कसे की ज्वालामुखीचा उद्रेक आणि जंगलातील आग यातून देखील निर्माण होतात. दुर्दैवाने अनियंत्रित कचरा जाळणारे (घनकचरा आणि रुग्णालयातील कचरा) हे, जेव्हा अपूर्ण ज्वलनामुळे वातावरणात डायऑक्सिन उत्सर्जनाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ते वारंवार सर्वात वाईट अपराधी असतात.
डायॉक्झिनचे परिणाम
लोक अल्पावधीसाठी मोठ्या प्रमाणात डायोक्झिनच्या संपर्कात आल्यास यकृताचे कार्य बिघडते तसेच क्लोरेक्ने आणि असमान त्वचेचा रंग यांसारख्या त्वचेच्या जखमांना कारणीभूत ठरते. प्रतिरोधक संस्था , विकसित होणारी मेंदू संस्था , एंडोक्राइन प्रणाली आणि पुरुत्पादन संस्था यांच्यावर दीर्घकालीन संपर्कामुळे परिणाम होतो. डायऑक्सिनच्या सतत दीर्घकाळ संपर्कामुळे कर्करोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्धारित केले आहे की 65 किलो वजनाची व्यक्ती केवळ 1.66 मायक्रोग्राम डायऑक्सिन वार्षिक सहन करू शकते. तथापि, 2019 मध्ये 72 मिलीग्राम डायऑक्सिनची गळती झाली. सीएसआयआर-एनआयआयएसटीने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की 2019 आणि 2020 च्या आगीत एकूण डायऑक्सिन उत्सर्जन अनुक्रमे 306 आणि 221mg विषारीपणा समतुल्य (TEQ) होते. संशोधनात असे आढळून आले की आग लागल्यानंतर हवेतील विशिष्ट डायऑक्सिनचे प्रमाण संदर्भ आणि फील्ड डेटापेक्षा 50 पट जास्त होते. मागील दोन आगीच्या विपरीत, जे अनुक्रमे दोन आणि चार दिवस जळत होते, ही आग दहा दिवसांपेक्षा जास्त काळ जळत आहे; त्यामुळे, उत्सर्जन पातळी आणखी जास्त असू शकते.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) वायु गुणवत्ता निर्देशांकानुसार, केरळामधीं हवेची गुणवत्ता ऑगस्ट 2022 पासून खराब होत चालली आहे . आणि डिसेम्बरपासून ही समस्या अतिशय वाईट झाली आहे. शहरातील शहरातील प्रचंड कचऱ्याच्या साठवण यार्डमध्ये मार्च 2 रोजी सुरु झालेल्या आगीने परिस्थिती अतिशय वाईट केली. जेंव्हा एअर पार्टिक्युलेट मॅटर इंडेक्स 300 होता (संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेली मर्यादा ५० आहे), तेंव्हा ब्रह्मपुरम कचरा प्रक्रिया सुविधेमध्ये आगीचा उद्रेक झाला. ब्रह्मपुरम आगीच्या घटनेननंतर रासायनिक कण आणि PM-10 खरखरीत कण प्रदूषणात वाढ झाली आहे. सल्फेट्स, नायट्रेट्स, क्लोराईड्स आणि कार्बन हे सर्व PM-10 मध्ये हवेत उच्च सांद्रतेमध्ये असतात. CPCB च्या एअर केमिकल डिटेक्टर डेटावरून असे दिसून येते की वातावरणात सल्फर डायऑक्साइड (SO2) आणि नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) यांची सांद्रता वाढली आहे. पर्यावरणीय शास्त्रज्ञांनी यामुळे ताकीद जरी केली आहे की उन्हाळ्याच्या पावसात सल्फ्यूरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड हे मोठ्या प्रमाणात असू शकतात.
कचरा व्यवस्थापन ही भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये नेहमीच एक समस्या राहिली आहे, परंतु आपल्याकडे यशोगाथा आहेत. योग्य घनकचरा व्यवस्थापन सुनिश्चित करणे आवश्यक आहे कारण अयोग्य कचरा व्यवस्थापनाचे परिणाम विशिष्ट स्थानापुरते मर्यादित नाहीत.
स्रोत: