Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

हवामान बदल हा पृथ्वीच्या सौर कक्षेत झालेल्या बदलामुळे होतो का?

विवेक सैनीद्वारे

दावा: नासाने हे कबुल केले आहे की हवामानातील बदलामागे पृथ्वीची सौर कक्षा हे कारण आहे, जीवाष्म इंधन जाळणे हे कारण नाही  

तथ्य: चुकीची माहिती. जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचे पृथ्वीच्या वातावरणात थेट उत्सर्जन किंवा इतर मानववंशजन्य क्रियाकलाप हे ग्रहाच्या अलीकडील तापमानवाढीचे प्रमुख कारण आहे.

दावा केलेली पोस्ट:

पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

28 जून 2023 रोजीची ट्विटर वापरकर्ता @KagensNews याने जागतिक बदलाबाबत चुकीची माहिती पसरवलेली एक व्हायरल झालेली पोस्ट. या ट्विटर हँडलने सामायिक केलेल्या फोटोमध्ये असे म्हटले आहे की, “नासा मान्य करते की पृथ्वीच्या सौर कक्षातील बदलांमुळे हवामानातील बदल  होतो, SUV आणि जीवाश्म इंधनामुळे नाही”. ट्विटर वापरकर्त्याने ट्विटमध्ये #Climatescam देखील वापरला आहे. 

आम्हाला काय आढळले

ही पोस्ट दिशाभूल करणारी आहे. हे तसे नसून वेगळे आहे, आणि असे आढळून आले आहे की सामाजिक माध्यमांवर असे सूचित करणारे व्यापक संदेश असून देखील, नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस एजन्सी (NASA) ने असे जाहीर केलेले नाही की हवामान बदल केवळ सूर्याभोवती असलेल्या पृथ्वीच्या परिभ्रमण स्थानामुळे होतो. सर्व हरितगृह वायू उत्सर्जनांपैकी 75% पेक्षा जास्त उत्सर्जन आणि कोळसा, तेल आणि वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांमधून सुमारे 90% कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन, हे जगातील हवामान बदलाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. 

हवामान बदल कशामुळे होतो?

तापमान आणि हवामानातील दीर्घकालीन बदलांना हवामानातील बदल असे म्हणतात. असे चढउतार लक्षणीय ज्वालामुखीचा उद्रेक किंवा सूर्याच्या क्रियाकलापातील फरकांमुळे होऊ शकतात. परंतु 1800 शतकापासून, मानवी क्रियाकलाप म्हणजे प्रामुख्याने कोळसा, तेल आणि वायू यासारखी जीवाश्म इंधन जाळणे- हे हवामान बदलाचे प्राथमिक कारण आहे. हरितगृह वायू निर्मितीमुळे सूर्याची उष्णता पृथ्वीवर त्यात अडकली जाते. तापमानवाढ आणि हवामान बदल हे त्याचाच परिणाम आहेत. जागतिक तापमानवाढीचा दर पूर्वी कधी नव्हता एवढा जास्त सध्या आहे. वाढणाऱ्या तापमानामुळे हवामानाचे आकृतिबंध बदलतात, ज्यामुळे नैसर्गिक व्यवस्था देखील बिघडते. यामुळे आपल्याला आणि पृथ्वीवरील इतर सर्व जीवसृष्टीला गंभीर धोका निर्माण होतो..

जीवाश्म इंधना जाळण्यामुळे हरितगृह वायू निर्माण होतात जे ग्रहाला आच्छादित करतात, सूर्यापासून येणारी  उष्णता अडवकतात आणि त्यामुळे तापमान वाढते. कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन हे हवामान बदलाला कारणीभूत असलेले  प्राथमिक हरितगृह वायू आहेत. उदाहरणार्थ, इमारत गरम करण्यासाठी कोळसा किंवा पेट्रोल जाळताना हे निर्माण होतात. लाकूड आणि जमीन साफ ​​केल्यावरदेखील कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जाऊ शकतो. मिथेन उत्सर्जनाचे प्राथमिक स्त्रोत म्हणजे तेल आणि वायू उत्पादन आणि शेती. हरितगृह वायू निर्माण करणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ऊर्जा, उद्योग, वाहतूक, इमारती, शेती आणि जमिनीचा वापर यांचा समावेश होतो.

हवामान बदलाला कारणीभूत असलेले मानववंशीय ड्राईव्हर्स 

पृथ्वीचा पृष्ठभाग 1800 व्या शतकाच्या उत्तरार्धातील उष्ण असण्यापेक्षा (औद्योगिक क्रांतीपूर्वी) सध्या सरासरी 1.1°C अधिक उष्ण आहे आणि मागील 100,000 वर्षांमध्ये होता त्यापेक्षा जास्त उबदार आहे. 1850 पासून शेवटची चार दशके ही कोणत्याही दशकापेक्षा जास्त उबदार राहिली आहेत, यामध्ये सर्वात अलीकडील दशक (2011-2020) हे रेकॉर्डवरील सर्वाधिक उबदार आहे.

हवामान शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले आहे की, गेल्या 200 वर्षांमध्ये, जवळजवळ सर्व जागतिक तापमानवाढ ही मानवामुळे झाली आहे. मानवी क्रियाकलापांमुळे निर्माण होणा-या हरितगृह वायूंमुळे पृथ्वी कमीत कमी गेल्या दोन हजार वर्षात जितक्या वेगाने उबदार होत होती त्यापेक्षा अधिक वेगाने उबदार होत आहे आणि अशा महत्त्वपूर्ण क्रियाकलापांची खाली चर्चा केली आहे:

1. वीज निर्मिती

उर्जा आणि उष्णता प्रदान करण्यासाठी जीवाश्म इंधन जाळणे हे जागतिक उत्सर्जनाच्या मोठ्या भागासाठी जबाबदार आहे. जगाला अजूनही बहुतांश वीज पुरवठा कोळसा, तेल किंवा वायू  जाळून केला जातो, ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रस ऑक्साईड, दोन शक्तिशाली हरितगृह वायू निर्माण होतात जे ग्रहाला आच्छादित करतात आणि सूर्याची उष्णता अडकवतात. जगाची एक चतुर्थांश वीज अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे तयार केली जाते, ज्यात पवन, सौर आणि इतर नैसर्गिक संसाधने यांचा समावेश होतो, जे जीवाश्म इंधनाच्या तुलनेत, हरितगृह वायू किंवा इतर वायू प्रदूषक अतिश कमी प्रमाणात किंवा नगण्य प्रमाणात निर्माण करतात.

  1. वस्तूंचे उत्पादन

उत्पादन आणि उद्योगातून होणारे उत्सर्जन हे प्रामुख्याने कापड, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, सिमेंट, लोखंड आणि पोलाद यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी जीवाश्म इंधन जाळण्याचा परिणाम आहे. काही उत्पादने, ज्यात प्लॅस्टिकचा समावेश आहे,  जीवाश्म इंधनापासून मिळविलेल्या रसायनांपासून उत्पादितकेली जातात, ज्याप्रमाणे उत्पादनात वापरली जाणारी अनेक यंत्रे  असतात. ही यंत्रे सहसा कोळसा, तेल किंवा वायूवर चालतात. हरितगृह वायू उत्सर्जन तयार करण्यातील आघाडीच्या जागतिक उत्पादकांपैकी एक आहे औद्योगिक क्षेत्र.

  1. जंगलतोड 

शेततळे, कुरणे तयार करण्यासाठी किंवा अन्य हेतूंसाठी जंगले साफ करणे आवश्यक आहे. जेव्हा झाडे तोडली जातात तेव्हा त्यांनी साठवलेला कार्बन वातावरणात सोडला जातो. जंगले  नष्ट होण्याचे प्रमाण दरवर्षी 12 दशलक्ष हेक्टर इतके आहे. कार्बन डायऑक्साइड शोषून, झाडे निसर्गाला वातावरणातील उत्सर्जन बाहेर ठेवण्यास मदत करतात. अशा प्रकारे, त्यांना कापून टाकल्याने ती क्षमता कमी होते. 

  1. वाहतूक 

बहुतांश मोटारी, ट्रक, जहाजे आणि विमाने जीवाश्म इंधनावर चालतात. परिणामी, वाहतूक हा हरितगृह वायूंचा, विशेषत: कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. अंतर्गत ज्वलन इंजिनमधील पेट्रोलियम-आधारित वस्तू, जसे की पेट्रोल, जाळणे हे बहुतेक योगदान देते. तथापि, जहाजे आणि विमानांमधून उत्सर्जन वाढतच आहे. वाहतुकीमुळे जागतिक ऊर्जा-संबंधित CO2 उत्सर्जनामध्ये अंदाजे एक चतुर्थांश योगदान दिले जाते..

  1. अन्न उत्पादन 

अन्न उत्पादन प्रक्रियेमध्ये  कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर हरितगृह वायूंचे विविध प्रकारे उत्सर्जित होते, ज्यामध्ये जंगलतोड आणि शेती आणि चरण्यासाठी जमीन साफ ​​करणे, गायी आणि मेंढ्यांद्वारे पचन, पिकांच्या वाढीसाठी शेणखताचे आणि खतांचे उत्पादन आणि शेतातील उपकरणे किंवा मासेमारी नौकांना उर्जा देण्यासाठी वापरली जाणारी वीज, हे सामान्यत: जीवाश्म इंधनाने केले जाते. यामुळे अन्न उत्पादन हे हवामान बदलाचे एक महत्त्वाचे कारण आहे. 

तीव्र दुष्काळ, पाण्याची टंचाई, विनाशकारी आग, समुद्राची वाढती पातळी, पूर, वितळणारे ध्रुवीय बर्फ, आपत्तीजनक वादळे आणि घटती जैवविविधता हे सध्या हवामान बदलाचे काही परिणाम आहेत.

जागतिक तापमानातील प्रत्येक वाढ महत्त्वाची आहे

हजारो शास्त्रज्ञ आणि सरकारी समीक्षकांनी UN अहवालांच्या पाठोपाठ सहमती दर्शवली की जागतिक तापमान वाढ 1.5°C पेक्षा होणार नाही याची मर्यादा संभाळल्यास आम्हाला हवामानातील सर्वात वाईट परिणाम टाळण्यास आणि राहण्यायोग्य वातावरण राखण्यास मदत होईल. असे असले तरी, वर्तमान धोरणे दर्शवतात की शतकाच्या अखेरीस तापमानात 2.8 डिग्री सेल्सिअस वाढ होईल.

हवामान बदलाचे उत्सर्जन जगभरातून येते आणि प्रत्येकावर परिणाम करते, जरी काही देश इतरांपेक्षा कितीतरी जास्त उत्सर्जन करतात. 2020 मध्ये, एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये सर्वोच्च सात उत्सर्जित करणारे (चीन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, भारत, युरोपियन युनियन, इंडोनेशिया, रशियन फेडरेशन आणि ब्राझील) अंदाजे निम्म्या उत्सर्जनासाठी जबाबदार होते.

लक्षणीय हवामान बदलाचे परिणाम जे जगभर अनुभवले गेले आहेत त्यांची खाली चर्चा केली आहे:

  1. अधिक उष्ण तापमान

1980 पासूनचे प्रत्येक दशक हे मागील दशकापेक्षा अधिक उष्ण राहिले आहे. उष्ण दिवस आणि उष्णतेच्या लाटा जवळजवळ सर्व भूभागांवर सामान्य होत चालला आहेत. तापमान वाढल्याने उष्णतेशी संबंधित आजार अधिक सामान्य होतात, ज्यामुळे घराबाहेर काम करणे अधिक आव्हानात्मक होत आहे. जेव्हा तापमान जास्त उष्ण असते, तेव्हा जंगलातील आग अधिक सहजपणे सुरू होते आणि अधिक वेगाने पसरते.

  1. तीव्र वादळे आणि चक्रीवादळे

जसे तापमान वाढते तशी अधिक बाष्पाचे बाष्पीभवन होते, त्यामुळे तीव्र पाऊस आणि पूर वाढतो आणि परिणामी अधिक विनाशकारी वादळे होतात. उष्ण महासागर देखील उष्णकटिबंधीय वादळांची वारंवारता आणि तीव्रता प्रभावित करतो. चक्रीवादळे, तुफान आणि टायफून घे  उबदार समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्यावर पोसले जतात. अशा वादळांमुळे वारंवार घरे आणि समुदाय उद्ध्वस्त होतात, परिणामी मृत्यू आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

  1. वाढता दुष्काळ 

हवामान बदलामुळे पाण्याची उपलब्धता बदलत आहे, ज्यामुळे अधिक ठिकाणी त्याची कमतरता भासत आहे. जागतिक तापमानवाढीमुळेजिथे  आधीच पाण्याचा दुष्काळ आहे तेथिल भागात पाण्याची टंचाई वाढते, आणि शेतीतील दुष्काळी पिकांना आणि पर्यावरणीय दुष्काळाची हानी होण्याची शक्यता वाढवते आणि पर्यावरणीय प्रणाली अधिक संवेदनशील बनवते.

  1. महासागरांचे तापमान वाढणे आणि महासागर वाढणे 

जागतिक तापमानवाढीमुळे उत्सर्जित होणारी बहुतांश उष्णता समुद्र शोषून घेतो. गेल्या दोन दशकांमध्ये, समुद्राच्या तापमानात सर्व खोल स्तरांवर प्रचंड वाढ झाली आहे. कारण पाणी जसजसे गरम होते तसतसे विस्तारते, समुद्र जसजसा गरम होतो तसतसे त्याचे घनफळ वाढते. वितळणाऱ्या बर्फामुळे समुद्राची पातळी वाढते, त्यामुळे किनारपट्टी आणि बेटावरील लोक धोक्यात येतात.

  1. आरोग्याची जोखीम 

हवामान बदल हा मानवतेला संघर्ष राया लावणारा सर्वात गंभीर आरोग्य धोका आहे. हवामान बदलामुळे आधीच वायू प्रदूषण, रोग, अति हवामान घटना, सक्तीचे विस्थापन, मानसिक आरोग्यावरील ताण आणि वाढलेली भूक आणि गरीब पोषण यामुळे आरोग्य समस्या निर्माण होत आहेत जेथे लोक वाढू शकत नाहीत किंवा पुरेसे अन्न मिळवू शकत नाहीत.

  1. गरिबी आणि विस्थापन

हवामान बदलामुळे गरीबी निर्माण करणारे आणि टिकवून ठेवणारे बदल वाढतात. पुरामध्ये शहरी झोपडपट्ट्यांमधील घरे आणि उपजीविका उद्ध्वस्त करण्याची क्षमता असते. उष्णतेमध्ये बाहेर काम करणे कठीण होऊ शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. हवामान-संबंधित घटनांमुळे गेल्या दशकात (2010-2019) दरवर्षी अंदाजे 23.1 दशलक्ष लोक विस्थापित झाले, त्यामुळे अनेकांना दारिद्र्याचा धोका निर्माण झाला. बहुतांश निर्वासित अशा राष्ट्रांमधून आले आहेत जे हवामान बदलाच्या प्रभावांना सामोरे जाण्यासाठी सर्वाधिक असुरक्षित आणि सर्वात कमी तयार आहेत.

संदर्भ

  1. https://www.un.org/en/climatechange/science/causes-effects-climate-change
  2. https://www.ipcc.ch/2021/08/09/ar6-wg1-20210809-pr/
  3. https://www.unep.org/interactive/six-sector-solution-climate-change/
  4. https://public.wmo.int/en/media/press-release/2020-was-one-of-three-warmest-years-record
  5. https://www.ipcc.ch/report/ar6/wg1/downloads/outreach/IPCC_AR6_WGI_SummaryForAll.pdf
  6. https://www.un.org/en/climatechange/science/causes-effects-climate-change#collapseOne
  7. https://www.ipcc.ch/report/ar6/wg2/resources/press/press-release
  8. https://www.ipcc.ch/assessment-report/ar6/
  9. https://www.unep.org/resources/emissions-gap-report-2022
  10. https://wedocs.unep.org/bitstream/handle/20.500.11822/40932/EGR2022_ESEN.pdf?sequence=8
  11. https://www.un.org/en/climatechange/science/causes-effects-climate-change
  12. https://www.un.org/en/climatechange/science/causes-effects-climate-change#collapseTwo
सीएफसी इंडिया
सीएफसी इंडिया
Articles: 74