Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
सीएफसी इंडिया / मार्च 16, 2023 / हवामान नाकारणे, तथ्य तपासणी
दावा
इनडोअर आणि आउटडोअर जागेमधील CO2 पातळीतील तफावत हे सिद्ध करते की हवामान बदल हा एक घोटाळा आहे.
तथ्य
इंडोअरमध्ये CO2 ची तीव्रता अधिक असणे हे सामान्य आहे आणि त्याची तुलना वातावरणातील CO2 च्या जागतिक सरासरी पातळीशी केली जाऊ शकत नाही, जे अभूतपूर्व दराने वाढत आहे ज्यामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे.
दावा केलेली पोस्ट
दावा काय म्हणतो
मार्च 10, 2023 रोजी एका ट्विटर पोस्टमध्ये ‘अँप्रोब’ CO2 मीटरचा फोटो पोस्ट करण्यात आला. त्यात आतील आणि बाहेरील नोंदवलेल्या विविध CO2 पातळीचा उल्लेख केला गेला आणि त्यांची तुलना 418 पीपीएमशी केली, जी संख्या CO2 च्या अलीकडील जागतिक सरासरीच्या जवळपास आहे. त्या पोस्टचा अर्थ असा होता की CO2 तीव्रतेच्या जागतिक सरासरीच्या तुलनेत आतमध्ये खूप जास्त आकडे नोंदवणे हे सिद्ध करते की हवामान बदल हा एक घोटाळा आहे.
इथे दाखविलेले अँप्रोब CO2-100 हे आतील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठीचे एक हॅण्डल असलेले कार्बन डायॉक्साईड मीटर आहे. ते 9999 ppm पर्यंत कार्बन डायॉक्साईड मोजते.
आम्हाला काय आढळले
एका अभ्यासानुसार, आतील हवेच्या गुणवत्तेत 1000 ppm च्या पेक्षा कमी कार्बन डायॉक्साईड तीव्रता स्वीकारार्ह आहे. सहसा, आतील वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड घातक पातळीत आढळत नाही. खुल्या वातावरणातही, कार्बन डाय ऑक्साईडची पातळी सामान्यत: 300 ते 400 पीपीएम (0.03% ते 0.04%) पर्यंत असते परंतु महानगर भागात 600-900 पीपीएम इतकी जास्त असू शकते.
तसेच सुमारे 200 दशलक्ष वर्षांपूर्वी, ज्युरासिक युगामध्ये, असा अंदाज आहे की पृथ्वीची कार्बन डायऑक्साइड पातळी 2000-6000 पीपीएमवर पोहोचली होती. परंतु हल्लीच्या परिस्थितीत या तपशिलाची तुलना बंद जागेतील CO2 पातळीशी केली जाऊ शकत नाही. पृथ्वीची सध्याची सरासरी कार्बन डायऑक्साइड पातळी सुमारे 420 पीपीएम आहे जी डायनासोर युगाच्या जवळपासही नाही. तथापि, जर आपण भूगर्भीय वेळेच्या प्रमाणात पाहिल्यास, आम्हाला आढळेल की CO2 पातळी तुलनेने कमी आहे, परंतु तज्ञांच्या मते, कार्बन डाय ऑक्साईड सारख्या हरितगृह वायू अभूतपूर्व दराने वाढत आहेत आणि भूतकाळातील अशाच वाढीमुळे मोठ्या प्रमाणात विलोपन झाले आहे.
कार्बन डायऑक्साइड पातळी कशी मोजली जाते?
आपल्या वातावरणात, कार्बन डाय ऑक्साईड वायू चांगला मिसळला आहे. म्हणजे, संपूर्ण जगामध्ये त्याची तीव्रता कमी अधिक प्रमाणात स्थिर आहे. परंतु आपण कार्बन डाय ऑक्साईडचा लक्षणीय स्रोत, जसे की जंगलातील आग, वायू उत्सर्जियत करणारा कारखाना, किंवा शहरीभागात गॅसोलिनवर चाहणाऱ्या कार्स, असलेल्या जागेच्या अगदी जवळ मोजले तर नोंद केलेली अटाळी हि जास्तच असणार. या कारणामुळे, शास्त्रज्ञ पृथ्वीच्या वातावरणातील CO2 ची सरासरी पातळी सतत मोजत राहतात, त्यासाठी संपूर्ण जगभर विविध दूरस्थ ठिकाणावरून हवेचे नमुने घेतले जातात, ज्यात सक्रिय ज्वालामुखीच शीर्षस्थान समाविष्ट आहे.
उपग्रह स्पेक्ट्रोस्कोपिक तत्त्वे वापरतात परंतु मोठ्या प्रमाणात. अशा उपग्रहांच्या मापनांमुळे पृथ्वीच्या वातावरणाचे एकूण चित्र सुधारते. उदाहरणार्थ, नासाचा फिरता कार्बन ऑब्झर्व्हेटरी (OCO-2) उपग्रह एखाद्या विशिष्ट प्रदेशातील कार्बन स्त्रोतांचा मागोवा घेऊ शकतो.
आत आणि बाहेर नोंद केलेल्या कार्बन डाय ऑक्साईडच्या पातळीमध्ये फरक का असतो?
आतील भागात मर्यादित जागा असते आणि इमारतीत राहणाऱ्या लोकांना सोडलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे (उदाहरणार्थ, मानव, पाळीव प्राणी इ.) CO2 पातळी सामान्यतः जास्त असते. केवळ मानवी चयापचयामुळे देखील CO2 पातळी 3,000 ppm पेक्षा जास्त असू शकते, विशेषतः कमी हवेशीर असलेल्या खोल्यांमध्ये. आतील भागात कार्बन डाय ऑक्साईडच्या उच्च पातळीमध्ये योगदान देणारे इतर मार्ग म्हणजे स्वयंपाक उपकरणे- विशेषत: गॅस स्टोव्ह.
हवामानाविषयीच्या चर्चेदरम्यान कार्बन डायऑक्साइडच्या उच्च पातळीचे कारण
‘हवामानाविषयी चर्चा’ किंवा तत्सम कोणतीही घटना सहसा बंद घरातील वातावरणात घडते. बंद घरातील जागेच्या बाबतीत, CO2 ची पातळी खालील गोष्टींवर अवलंबून असते:
एखाद्या क्षेत्रात बराच काळ अनेक लोक उपस्थित असतील आणि हवा मर्यादित प्रमाणात खेळती असेल तर आतील भागात कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण शेकडो ppm पासून ते हजारो ppm पर्यंत कमी जास्त होऊ शकते. आतील वातावरणात राहणाऱ्यांची संख्या जितकी जास्त असेल तितके आतील हवेत CO2 चे प्रमाण जास्त असेल.
आतील हवेतील CO2 ची किती पातळी चिंताजनक असते?
CO2 हा आतील हवेच्या गुणवत्तेचा निर्णायक घटक आहे. लोकांची संख्या जेवढी अधिक तेवढे घरातील वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने, असे मानणे सुरक्षित आहे की CO2 ची तीव्रता मानव आणि वायुवीजन यांच्या उपस्थितीशी सुसंगत आहे. याचे कारण असे की वायुविजनाची कमी असल्यास कार्बन डाय ऑक्साईड जमा होऊ शकतो कारण तो मानवाने सोडलेल्या श्वासात असतो आणि त्यामुळे इतर वायूंची घरातील तीव्रता सौम्य करू शकतो किना अन्य वायू पूर्णपणे घालवू शकतो.
या सारणीमेढे घरातील हवेत CO2 च्या विविध तीव्रता दर्शविल्या आहेत:
पार्टस पर मिलियन (ppm) कार्बन डायऑक्साइड पातळी | परिणाम |
250-350 ppm | बाहेरील हवेची सामान्य पातळी |
350-1,000 ppm | पुरेशा वाजवीजनासह व्यापलेल्या जागांमध्ये ठराविक पातळी |
1,000-2,000 ppm | गुंगी आणि श्वास न घेता येऊ शकणाऱ्या हवेच्या तक्रारी |
2,000-5,000 ppm | डोकेदुखी, गुंगी, आणि साठलेली, शिळी, भरलेली हवा; लक्ष एकाग्र करण्यात अडचण, लक्ष कमी होणे, हृदय गती वाढणे आणि थोडी मळमळ देखील असू शकते. |
>5,000 ppm | विषाक्तता किंवा ऑक्सिजनची कमतरता (एस्फिक्सिया) होऊ शकते. दैनंदिन कामाच्या ठिकाणी संपर्काकरिता ही अनुज्ञेय संपर्क मर्यादा आहे. |
>40,000 ppm | ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही पातळी जीवासाठी त्वरित हानिकारक / धोकादायक आहे. |
विविध मानवी क्रियाकलापांमधून, जसे की जीवाश्म इंधन जाळणे, यामुळे होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे शेवटी वातावरणात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढवत आहे. कार्बन डायऑक्साइडच्या वाढत्या पातळीचा थेट परिणाम हवामान बदलावर होतो.
2016 पर्यंत, एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात CO2 चा वाटा सुमारे 74.4 टक्के होता.
IPCC च्या 2021 मधील प्रमुख हवामान विज्ञान अहवालात असे म्हटले आहे की 1960 ते 2019 पर्यंत झालेल्या उष्णता बदल प्रक्रियेत, CO2 चे योगदान 60 टक्क्यांहून अधिक होते.
अशाप्रकारे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढत्या पातळीमुळे ती एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे.
संदर्भ: